'परे'च्या प्रवाशांसाठी लवकरच 35 एटीएम

 Pali Hill
'परे'च्या प्रवाशांसाठी लवकरच 35 एटीएम

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पैसे काढता यावेत म्हणून 15 स्थानकांवर 35 एटीएम बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. या नव्या मशिनमधून 2000 हजार रुपयांची नवी नोटही काढण्यात येणार आहे. मरिन लाइन्स, ग्रॅंट रोड, माहिम, वांद्रे जंक्शन, जोगश्वरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली, दहिसर, मिरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार या स्थानकांवर ही सुविधा प्रवाशांना देण्यात येणार आहे. या मशिन कधी बसवणार हे जरी अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी या संदर्भाची निविदा रेल्वे प्रशासनानं काढलीय. या मशिन्स तिकीट खिडक्या, फलाट आणि पादचारी पूल अशा ठिकाणी असतील अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिलीय.

Loading Comments