Advertisement

लालबागमध्ये गिरणी कामगारांसाठी 444 नवी घरं


लालबागमध्ये गिरणी कामगारांसाठी 444 नवी घरं
SHARES

मुंबई - गिरणी कामगारांसाठी अधिकाधिक घरं कशी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुरू आहे. या प्रयत्नातूनच आता लवकरच गिरणी कामगारांसाठी लालबाग येथे 444 नवी घरं उपलब्ध होणार असल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.
मफतलाल मिलची 481.43 चौ. मी., मातुल्य मिलची 388.30 चौ. मी., हिंदुस्थान मिल युनिट अ आणि ब ची 542.10 चौ. मी, व्हिक्टोरिया मिलची 850 चौ. मी., हिंदुस्थान मिलची 602.15 चौ. मी. आणि एमएसटीसीची 1009.83 चौ. मी. अशी एकूण 3873.81 चौ. मी. जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी म्हाडाच्या ताब्यात आली आहे. मात्र या जमिनी खूपच छोट्या असल्यानं तिथे घरं बांधणं अशक्य होत आहे. त्यामुळे म्हाडानं या सर्व जमिनीच्या मोबदल्यात महानगरपालिकेला मिळालेल्या वेस्टर्न इंडिया मिल, लालबाग येथील भूखंडाची अदलाबदल करत तो भूखंड म्हाडाला द्यावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर पालिकेनं सकारात्मकता दर्शवली असून हा प्रस्ताव लवकरच मान्य होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यानुसार ही जमीन मिळाल्यास त्यावर कामगारांसाठी 444 घरं बांधली जाणार आहेत. तर या जमिनीवर 218 संक्रमण शिबिरांचे गाळेही म्हाडासाठी उपलब्ध होतील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा