Advertisement

मेट्रो ३- ८० टक्के भुयारीकरण पूर्ण

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (MMRC) सुरू असलेल्या मेट्रो-३ मार्गिकेच्या (metro 3) भुयारीकरणाचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. या मार्गिकेवर येत्या जूनपासून रूळ टाकण्याचं सुरू काम करण्यात येईल.

मेट्रो ३- ८० टक्के भुयारीकरण पूर्ण
SHARES

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (MMRC) सुरू असलेल्या मेट्रो-३ मार्गिकेच्या (metro 3) भुयारीकरणाचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. या मार्गिकेवर येत्या जूनपासून रूळ टाकण्याचं सुरू काम करण्यात येईल. या कामाची जबाबदारी लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो लिमिटेड (L & T) कंपनी वर असणार आहे.

कुलाबा- वांद्रे-सीप्झ (colaba-bandra-seepz metro 3) या मेट्रो- ३ मार्गिकेच्या ५५ किलोमीटर लांबीच्या भुयारीकरणाचं (tunneling work) काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या संपूर्ण मार्गिकेवर ८५ टक्के खोदकाम करण्यात आलं असून आतापर्यंत ८० टक्के भुयारीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. त्याचसोबत मेट्रो मार्गिकेतील स्थानकांचं ७१ टक्के काम पूर्ण झालं आहे. यामध्ये मरोळनाका स्थानकाचं ६७ टक्के, विधानभवन स्थानकाचं ६५ टक्के आणि सीप्झ स्थानकाचं ५८ टक्के काम पूर्ण झालं आहे. स्थानकांची कामे होताच पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी दरम्यानची सेवा सुरू करण्यावर ‘एमएमआरसी’चा भर असेल.

त्यानुसार जून महिन्यापासून काम पूर्ण झालेल्या मार्गिकेवर रूळ (metro 3 track) टाकण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. या कामाची जबाबदारी एल अँड टी वर असणार आहे. त्यासाठी एल अँड टी सोबत करार देखील करण्यात आला आहे. जमिनीपासून २२ मीटर खाली मेट्रो ३ साठी मार्गिका तयार करण्यात येत आहे. एकूण १७ टीबीएम मशीनच्या माध्यमातून ३२ पैकी २५ ब्रेक थ्रू पूर्ण करण्यात आले आहे. केवळ ७ ब्रेक थ्रू उरले असून या ब्रेक थ्रूचं कामही वेगात करण्यात येणार आहे.   


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा