Advertisement

EXCLUSIVE: कल्याण खोणी-शिरढोणमधील ५ हजार घरांसाठी जानेवारीत जाहिरात

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोकण मंडळाकडून ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं घरांची निर्मिती केली जात आहे. भंडार्ली, शिरढोण, गोठेघर, खोणी अशा ठिकाणी, ठाणे जिल्ह्यात सुमारे ३२ हजार घरांची निर्मिती कोकण मंडळाकडून केली जात आहे. त्यानुसार खोणी-शिरढोण येथील ३,९३७ घरांच बांधकाम वेगानं पुढं गेल आहे.

EXCLUSIVE: कल्याण खोणी-शिरढोणमधील ५ हजार घरांसाठी जानेवारीत जाहिरात
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १३८४ घरांसाठी रविवार मोठ्या उत्साहात लाॅटरी पार पडली. १ लाख ६४ हजार ४०० अर्जदारांमधून केवळ १ हजार ३८४ अर्जदारांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं. तर १ लाख ६३ हजार अर्जदारांचं घराचं स्वप्न भंगलं आहे. आता या नाराज अर्जदारांना खरी प्रतिक्षा असेल ती पुढच्या घराच्या लाॅटरीची. तर या अर्जदरांसाठी खुशखबर आहे. 

पुढच्या वर्षी मुंबईतल्या घरांची लाॅटरी फुटेल, पण ती नेमक्या किती घरांसाठी असेल हे मुंबई मंडळाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र, मुंबईबाहेर हक्काचं घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी मात्र एक आनंदाची बाब आहे. म्हाडाच्या कोकण मंडळानं जानेवारीत सुमारे ५ हजार घरांसाठी लाॅटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे.


अत्यल्प गटासाठी घरं

त्यानुसार जानेवारीत कल्याण खोणी-शिरढोण मधील ५ हजार घरांची लाॅटरी काढण्याच्यादृष्टीनं जाहिरात काढण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे. ही सर्व घरं पंतप्रधान आवास योजनेतील असून ही घरं अत्यल्प गटासाठी असणार आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने, ५ हजार घरं अत्यल्प गटासाठी कल्याणमध्ये उपलब्ध होणार असल्यानं ही सर्वसामान्यांसाठी मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे.


फेब्रुवारीत लाॅटरी 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोकण मंडळाकडून ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं घरांची निर्मिती केली जात आहे. भंडार्ली, शिरढोण, गोठेघर, खोणी अशा ठिकाणी, ठाणे जिल्ह्यात सुमारे ३२ हजार घरांची निर्मिती कोकण मंडळाकडून केली जात आहे. त्यानुसार खोणी-शिरढोण येथील ३,९३७ घरांच बांधकाम वेगानं पुढं गेल आहे. तेव्हा या घरांसह येथील अन्य घरं समाविष्ट करत एकूण ५ हजार घरांसाठी फेब्रुवारीदरम्यान लाॅटरी काढण्याचा कोकण मंडळाचा विचार आहे. त्यानुसार कोकण मंडळ तयारीला लागलं आहे. 


प्रक्रियेला वेग

या घरांच्या किंमती ठरवण्यासह इतर प्रक्रियेला आता वेग देण्यात आला आहे. जानेवारीच्या अखेरीस या लाॅटरीसाठी जाहिरात काढण्याचा कोकण मंडळाचा मानस आहे. त्यामुळं कल्याणमध्ये परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचा असेल तर मग आता तयार व्हा, कोकण मंडळाच्या लाॅटरीसाठी.हेही वाचा - 

म्हाडा लाॅटरी : अनिता तांबे पहिल्या भाग्यवान विजेत्या
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा