Advertisement

बॅकबे वॉटरफ्रंटचे 2026 पर्यंत मॉडर्न अर्बन हबमध्ये रूपांतर होणार

नव्या योजनेमुळे या जमिनीचा अधिक चांगला वापर होणार आहे.

बॅकबे वॉटरफ्रंटचे 2026 पर्यंत मॉडर्न अर्बन हबमध्ये रूपांतर होणार
SHARES

महाराष्ट्र (maharashtra) सरकारने (government) मुंबईतील (mumbai) बॅकबे परिसराचा कायापालट सुरू केला आहे.  बॅकबे रिक्लेमेशन योजनेच्या अद्ययावत विकास आराखड्याला सप्टेंबरमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

बॅकबे रिक्लेमेशन योजना प्रथम 1920 मध्ये सादर करण्यात आली होती.   ही योजना शहरी समस्यांवर काम करताना परिसराचे सौंदर्य सुधारण्यासाठी महत्त्वाची आहे. वाहतूक व्यवस्थापन, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि पर्यटन आणि मनोरंजनासाठी नवीन जागा निर्माण करणे हे देखील यामागचे मुख्य उद्दिष्टे आहे.

अहवालानुसार, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमानुसार दर 20 वर्षांनी शहराच्या विकास आराखड्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला नवीन आव्हाने प्रतिबिंबित करण्यासाठी योजना अद्ययावत करण्याचे काम देण्यात आले होते.

2001 पासून, बारा हेक्टर जमिनीवर या प्रकल्पासाठी दावा करण्यात आला आहे.  नव्या योजनेमुळे या जमिनीचा अधिक चांगला वापर होणार आहे. 

या योजनेमुळे मनोरंजक उपक्रम आणि सागरी पर्यटनास मदत मिळेल. यामध्ये रहिवासी आणि पर्यटक दोघांसाठी सुसज्ज मार्ग, कारंजे, लेझर शो आणि एक निसर्गरम्य प्लाझा असेल. समुद्रात लहान बोटी आणि नौका यांच्यासाठी डॉकिंग सुविधांचा समावेश असेल. ज्यामुळे या भागाचे आकर्षण आणखीन वाढेल.

कोस्टल रोड, मुंबई मेट्रो लाइन 3 आणि ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंटसह बॅकबेच्या आसपास अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे लोकसंख्या आणि रोजगार वाढीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी नवीन रस्ता नरिमन पॉइंटला जोडेल. विधानभवनाच्या नव्या विस्ताराचीही योजना आहे.

आधुनिक पायाभूत सुविधांसोबतच हा प्रकल्प मुंबईचा इतिहास जतन करण्यावर भर देणार आहे. हा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.



हेही वाचा

मुंबई : अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आग, तिघांचा मृत्यू

प्रायोगिक तत्त्वावर लोणावळा स्थानकांवर 'या' गाड्यांना अतिरिक्त थांबा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा