Advertisement

सी लिंकचा प्रवास महागणार -१ एप्रिलपासून नवे दर

वांद्रे-वरळी सी लिंकचा प्रवास येत्या १ एप्रिलपासून महागणार आहे. छोट्या वाहनांना आतापर्यंत एका बाजूने जिथे ६० रुपये मोजावे लागत आहेत तिथे ७० रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी जिथे ९० रुपये मोजावे लागायचे तिथे आता १ एप्रिलपासून १०५ रुपये मोजावे लागणार आहेत.

सी लिंकचा प्रवास महागणार -१ एप्रिलपासून नवे दर
SHARES

वांद्रे-वरळी सी लिंकचा प्रवास येत्या १ एप्रिलपासून महागणार आहे. छोट्या वाहनांना आतापर्यंत एका बाजूने जिथे ६० रुपये मोजावे लागत आहेत तिथे ७० रुपये, तर परतीच्या प्रवासासाठी जिथे ९० रुपये मोजावे लागायचे तिथे आता १ एप्रिलपासून १०५ रुपये मोजावे लागणार आहेत.

दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि टोलवसुली कंत्राटदारांमधील करारानुसार दर तीन वर्षांनी सी लिंकच्या टोलच्या दरात वाढ केली जाते. याआधी एप्रिल २०१५ मध्ये टोलदरात वाढ झाली होती आणि ती वाढ १८ टक्क्यांची होती. यंदाही टोलच्या दरात मोठी वाढ करत एमएसआरडीसीनं टोलधाड सुरूच ठेवली आहे. महत्त्वाचं म्हणजे २०५२ पर्यंत मुंबईकरांना या टोलधाडीचा सामना करावा लागणार आहे. कारण वांद्रे-वरळी सी लिंकच्या बांधकामादरम्यान वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी २०३९ एेवजी २०५२ पर्यंत टोलवसुली करण्याचा निर्णय एमएसआरडीसीनं घेतला असून याला राज्य सरकारनंही हिरवा कंदील दाखवला आहे.

अशी असेल टोलधाड

वाहनसिंगल ट्रिप
रिटर्न ट्रिप
डेली पास
मासिक पास
५०
सिंगल ट्रिप
१००० सिंगल ट्रिप
कार-जीप-टाटा सुमो
७०
१०५
१७५
३५००
३१५०
५६००
मिनी बस-एलसीव्ही
११०
१६५
२७५
५५००
४९५०
८८००
ट्रक-बस
१४५
२१५
३६०
७२५०
६५२५
११६००

हेही वाचा

बेकायदा टोलवसुलीला बसणार चाप, टोलनाक्यांवर आता MSRDCचे कर्मचारी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा