Advertisement

बीडीडीवासीयांचा म्हा़डाविरोधात एल्गार


बीडीडीवासीयांचा म्हा़डाविरोधात एल्गार
SHARES

मुंबई - नायगाव आणि डीलाईट रो़ड येथील बी़डी़डी चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने निविदा मागवल्या असल्या तरी नायगाव, डिलाईट रोड, शिवडी आणि वरळी अशा सर्वच ठिकाणच्या बीडीडीवासियांमध्ये म्हा़डाविरोधात अजूनही प्रचंड नाराजी आहे. निविदा मागवल्या असल्या तरी रहिवाशांच्या मागण्यांकडे काणाडोळा करत पुनर्विकास होणार असेल तर पुनर्विकास करु देणार नाही, अशी भूमिका बीडीडीवासियांनी घेतली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यापासून बीडीडी चाळीत बैठका घेण्यात येणार असून आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती येथील अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी दिली आहे.

रहिवाशांचे आक्षेप :-

  1. बीडीडी पुनर्विकास धोरणानुसार रहिवाशांचा संमतीचा अधिकार नाकारण्यात आला
  2. व्यावसायिक गाळेधारकांना किती फुटाचा गाळा मिळणार याविषयीची तरतूद नाही
  3. बीडीडीवासियांच्या क्षेत्रफळ, भाडे आणि कॉपर्स फंडाच्या मागणीचाही विचार धोरणात नाही

यामुळे बीडीडीवासीय आता म्हाडा आणि सरकारविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचंही माने यांनी स्पष्ट केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा