वीजबिलात सवलत मिळणार

 Fort
वीजबिलात सवलत मिळणार

सीएसटी - मुंबईकरांना येत्या डिसेंबरपासून वीजबिलात 20 टक्के सवलत मिळणार आहे. बेस्टला हा निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडले असा दावा आम आदमी पक्षाचे नेते सतीश जैन यांनी केलाय. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते. 'याचे श्रेय लाटण्यासाठी मनसे आणि शिवसेनं चढाओढ केली होती', 'मात्र हा निर्णय आपमुळे झाला' असा दावा जैन यांनी केलाय. 'बेस्ट परीवहन तुटीची आकारणी बेस्ट वीज ग्राहकांच्या माथी मारत होते, त्याविरोधात आपचे नेते कमलाकर शेनॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यामुळं हा निर्णय झाल्याचं जैन यांनी सांगितलं.

Loading Comments