• मेट्रो 3 प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
SHARE

गिरगाव - वेगवान मुंबईला आणखी गती देण्यासाठी मेट्रो 3 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलीये. पण सरकारच्या या निर्णयाला गिरगावातील काही जणांचा विरोध आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी त्यांनी एक नव्याच प्रकारचं आंदोलन केलंय. त्यांनी चक्क मेट्रोचं काम सुरू आहे, तिथल्या पत्र्यांना काळं फासलंय. कुलाबा-वांद्रे-सिप्झ असा मेट्रो तीनचा मार्ग आहे. काही दिवसांपूर्वीच हे काम सुरू झालंय. तर या प्रकल्पाला शिवसेनेनं आधीपासूनच विरोध केलाय. मेट्रो 3च्या मार्गावरील गिरगाव आणि काळबादेवी भागातली 115 कुटुंबं आणि 257 दुकानांचं काय, हा प्रश्न अजून सुटलेला नाही. तरीही काम सुरु झालं, याबद्दल रहिवाशांत असंतोष आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या