Advertisement

गोरेगाव–मागाठाणे 5.5 किमी ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचा प्रस्ताव

प्रकल्प पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन उपनगरांमधील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.

गोरेगाव–मागाठाणे 5.5 किमी ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचा प्रस्ताव
SHARES

पालिकेने Brihanmumbai Municipal Corporation (BMC) गोरेगाव (फिल्म सिटी) ते मागाठाणे दरम्यान 5.5 किमी लांबीचा ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे प्रस्तावित केला आहे. हा मार्ग वेर्स्टन एक्स्प्रेस वे Western Express Highway (WEH) च्या समांतर धावणार आहे.

हा कॉरिडॉर Mumbai Coastal Road (नॉर्थ) म्हणजे वर्सोवा–दहिसर–भाईंदर लिंक रोड (VDBLR) आणि Goregaon–Mulund Link Road (GMLR) यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल. यामुळे शहर आणि उपनगरांदरम्यान जलद आणि अखंड कनेक्टिव्हिटी मिळणार असून वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात घटेल.

या रस्त्याद्वारे कोस्टल रोडवरून थेट मागाठाणे येथे प्रवेश मिळणार आहे. येथून वाहनं गोरेगावमधील फिल्म सिटीखाली बांधकाम सुरू असलेल्या ट्विन टनेलमधून GMLR वर पोहोचू शकतील. त्यामुळे पूर्व उपनगरातील मुलुंड आणि पुढे ऐरोलीपर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.

प्रशासनाच्या मते, या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रमुख महामार्ग आणि जलद वाहतूक मार्गांना जोडेल. सध्या दोन्ही एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने अशा नवीन लिंक रस्त्यांची गरज आहे. हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर एक तासाहून अधिक लागणारा प्रवास केवळ 10 मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

BMC ने या प्रकल्पाचे बांधकाम आराखडे अंतिम केले असून, मार्गातील काही अतिक्रमणे हटवणे बाकी आहे. ती हटवल्यानंतर खर्चाचा अंदाज तयार करून टेंडर प्रक्रिया सुरू केली जाईल. हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.



हेही वाचा

मध्य मुंबईत वाहतुकित बदल

दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा