Advertisement

मुंबईतील रस्त्यांच्या गुणवत्तेवर सल्लागारांची नजर

निविदांमध्ये नमूद केलेल्या कलमांचे कंत्राटदारांकडून पालन करण्यात येतं की नाही यावरही हे सल्लागार लक्ष ठेवतील.

मुंबईतील रस्त्यांच्या गुणवत्तेवर सल्लागारांची नजर
SHARES

मुंबईतील रस्त्यांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) ८ गुणवत्ता व्यवस्थापन सल्लागार (QMC) नियुक्त केले आहेत. हे सल्लागार रस्त्यांची देखभाल, बांधकाम आणि काँक्रिटीकरण अशी सर्व जबाबदारी घेतील.

निविदांमध्ये नमूद केलेल्या कलमांचे कंत्राटदारांकडून पालन करण्यात येतं की नाही यावरही हे सल्लागार लक्ष ठेवतील.

यासाठी ८ खाजगी सल्लागार एजन्सी आहेत ज्यांना सिव्हिल इंजिनीअरिंग आणि रस्त्यांच्या देखभालीच्या कामात निपुणता आहे. पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, क्यूएमसी वर्षभर रस्त्यांच्या देखरेखीचं काम हाताळतील. दोन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

“हे सल्लागार बांधकामाच्या दरम्यान आणि नंतर गुणवत्ता तपासणी करतील आणि कंत्राटदारांनी केलेलं काम प्रमाणित करतील. सल्लागारांनी बांधकामाच्या दर्जाची पाहणी करून होकार दिल्यानंतरच पालिका केलेल्या कामाला मान्यता देईल आणि पैसे देतील,” वेलरासू म्हणाले.

शिवाय, ते पुढे म्हणाले की, हे सल्लागार सिमेंट, स्टील आणि रेडी-मिक्स काँक्रीट (RMC) च्या गुणवत्तेसह रस्त्यांच्या बांधकामादरम्यान वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची आणि घटकांचीही गुणवत्ता तपासणी करेल.

सध्या, २००० किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे पालिकेच्या अखत्यारीत येते. त्यापैकी, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, १००० किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे आणि चालू वर्षात, २०० किलोमीटरच्या रस्त्याचे पालिका काँक्रिटीकरण करणार आहे.

“सल्लागारांना त्यांच्या कामानुसार पैसे दिले जातील. आम्ही एक फॉर्म्युला तयार करू ज्यामध्ये रस्त्यांची लांबी आणि रुंदी समाविष्ट असेल आणि त्यामध्ये समाविष्ट असलेल्या बांधकाम क्षेत्राच्या आधारावर पालिका पैसे देईल,” अशी माहिती पी वेलरासू यांनी हिंदुस्थान टाईम्सला दिली.

मुंबईत एकूण सात महापालिका झोन आहेत. झोन १ ते ६ साठी प्रत्येकी एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, बोरिवली, कांदिवली आणि दहिसर या परिसराचा समावेश असलेल्या महापालिका झोन ७ साठी BMC नं दोन सल्लागार नियुक्त केले आहेत.



हेही वाचा

मुंबईतल्या 'या' उड्डाणपुलांचे होणार सुशोभिकरण

नरिमन पॉइंटला कुलाब्याशी जोडण्यासाठी सी-लिंक बांधणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा