Advertisement

बीएमसी कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन आणि स्कायवॉक जोडणारा FOB बांधणार

स्थानिकांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

बीएमसी कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन आणि स्कायवॉक जोडणारा FOB बांधणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने स्थानिकांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, कॉटन ग्रीन येथील सध्याच्या स्कायवॉक आणि रेल्वे स्टेशनला जोडणारा फूट-ओव्हर-ब्रिज (FOB) बांधणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) आणि मध्य रेल्वे (CR) कडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे.

कॉटन ग्रीन येथील स्कायवॉक रेल्वे स्टेशनला जोडलेला नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशी आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. माजी स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी FOB साठी पालिकेकडे पाठपुरावा केला. 

काही वर्षांपूर्वी पुल विभागाचे अधिकारी आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी या ठिकाणी भेट दिली होती. तब्बल दहा वर्षांनी या प्रस्तावाची प्रत्यक्षात अमलबजावणी होणार आहे. पडवळ यांनी बीएमसीला सध्याचा स्कायवॉक तोडून टाकण्याची विनंती केली, कारण ते लोक जास्त वापरत नाहीत आणि फक्त विक्रेते वापरत आहेत.

एफओबी बांधकामासाठी, बीएमसीने जूनमध्ये निविदा प्रक्रिया सुरू केली. या प्रकल्पासाठी 3.33 कोटी खर्च अपेक्षित आहे. SVJ Inovabuild Pvt Ltd, सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. अंदाजित दरापेक्षा 23.51% कमी होती. या पुलासाठी अतिरिक्त खर्चासह एकूण 4.21 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पावसाळ्याचा अपवाद वगळता, बांधकामाचे वेळापत्रक 12 महिन्यांचे आहे. पुलाच्या बांधकामावर सीआर आणि एमपीटी या दोघांचे अधिकार क्षेत्र असल्याने, निवडलेल्या कंत्राटदाराने दोन्ही संस्थांकडून एनओसी घेणे आवश्यक आहे.

सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर येत्या सहा महिन्यांत बांधकाम सुरू होणे अपेक्षित आहे. पुलाच्या डिझाइनमध्ये प्रत्येकी 50 मीटर लांबी आणि 2.5 मीटर रुंदीचे दोन स्पॅन समाविष्ट केले आहेत.

मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 2007 मध्ये बांधलेल्या सुमारे 24 स्कायवॉकची मालकी नंतर बीएमसीने घेतली. आता स्कायवॉक बांधणे, दुरुस्त करणे आणि देखभाल करणे हे बीएमसीचे कर्तव्य आहे. दुसरीकडे, रेल्वे स्थानक पुलांना जोडणाऱ्या स्कायवॉकला केवळ सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची नोंद करण्यात आली. 

मात्र, अंतर्गत रस्त्यांना जोडलेल्या स्कायवॉकचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी आहे. वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना स्कायवॉकचा वापर करता येत नाही. काही स्कायवॉकवर अंमली पदार्थांचे व्यसन आणि नशेडींचा मुक्काम सुरू झाला आहे.

जोगेश्वरी (पू) येथील स्कायवॉकमध्ये एस्केलेटर लावण्यात आले आहे. पण स्कायवॉकचा वापर क्वचितच केला जातो, त्यामुळे त्याचा हेतू पूर्ण होत नाही.

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या म्हणण्यानुसार, स्कायवॉकवर लिफ्ट आणि एस्केलेटर बसवण्याचे निर्देश बीएमसीला देण्यात आले आहेत. 



हेही वाचा

मुंबई ते नवी मुंबई गाठा फक्त 15 मिनिटांत

शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प 2025च्या अखेरीस पूर्ण होईल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा