Advertisement

मढमधील गोदामांवर महापालिकेची कारवाई


मढमधील गोदामांवर महापालिकेची कारवाई
SHARES

मढ - मालाडच्या मढमधील चित्रपट आणि मालिकांच्या सेटचे सामान ठेवण्यात येणाऱ्या अनधिकृत गोदामांच्या बांधकामांवर महापलिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. तीन गोदामांसह 35 अनधिकृत बांधकामांवर कारवाई हाती घेण्यात आली आहे.

मढ, मालवणी, राठोडी, चिकुवाडी, पटेलवाडी, धारावली, टोकारा, शंकरवाडी आदी परिसरात चित्रपट आणि मालिका यांच्या चित्रीकरणासाठी लागणारे आवश्यक ते सामान ठेवण्याकरिता 3 अनधिकृत गोडाऊन बांधण्यात आले होते. तसेच, खासगी जागेवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता या 3 बांधकामांसह एकूण 8 व्यावसायिक स्वरुपाची अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती.

याचबरोबर याच परिसरात 27 निवासी स्वरुपाची अनधिकृत बांधकामे देखील करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण 35 बांधकामे तोडण्याची कारवाई महापालिकेच्या ‘पी /उत्तर’ विभागाद्वारे करण्यात येत आहे. यापैकी आतापर्यंत व्यवसायिक स्वरुपाची 3 अनधिकृत बांधकामे, तर निवासी स्वरुपाची 20 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असल्याचे पी / उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. संगिता हसनाळे यांनी सांगितले. उर्वरित 5 व्यवसायिक स्वरुपाची बांधकामे आणि 7 निवासी स्वरुपाची बांधकामे जमीनदोस्त करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

परिमंडळ - 4 चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत मुंबई पोलीस दलाच्या 12 कर्मचाऱ्यांसह महापालिकेचे 12 कामगार, कर्मचारी आणि अधिकारी हे उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय