Advertisement

सिडकोने बनवलं खास लाॅटरीसाठी 'अॅप'

सिडकोने खास लाॅटरीसाठी अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला असून येत्या ८ दिवसांत हे अॅप सुरू होईल, अशी माहिती सिडकोतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली. हे अॅप सुरू झाल्यानंतर सिडकोचे अॅप हाती आले हो, अवघड सोपे झाले हो... अशीच इच्छुकांची भावना असेल, असा दावाही सिडकोकडून केला जात आहे.

सिडकोने बनवलं खास लाॅटरीसाठी 'अॅप'
SHARES

सिडकोने नवी मुंबईत १४ हजार ८३८ घरांसाठी लाॅटरी जाहीर केली असून या लाॅटरीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार सिडकोच्या संकेतस्थळावर जाऊन इच्छुक अर्ज भरत आहेत. पण लाॅटरीसाठी अर्ज करण्याची अवघड प्रक्रिया सोपी होणार आहे ती सिडकोच्या नव्या अॅपमुळे.

सिडकोने खास लाॅटरीसाठी अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला असून येत्या ८ दिवसांत हे अॅप सुरू होईल, अशी माहिती सिडकोतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली. हे अॅप सुरू झाल्यानंतर सिडकोचे अॅप हाती आले हो, अवघड सोपे झाले हो... अशीच इच्छुकांची भावना असेल, असा दावाही सिडकोकडून केला जात आहे.


आॅक्टोबरला फुटणार लाॅटरी

अत्यल्प आणि अल्प गटातील १४ हजार ८३८ घरांसाठी सिडकोने लाॅटरी जाहीर केली असून २ आॅक्टोबरला ही लाॅटरी फुटणार आहे. आॅनलाईन पद्धतीने लाॅटरी काढत म्हाडाने लाॅटरीमध्ये पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे म्हाडाच्याच पावलावर पाऊल टाकत सिडकोनेही आता आॅनलाईन पद्धतीने लाॅटरी काढण्यास सुरूवात केली आहे.

लाॅटरीसाठी १३ आॅगस्टपासून नोंदणीला, तर १५ आॅगस्टपासून अर्जविक्री-स्वीकृतीला सुरूवात झाली आहे. सिडकोची घर खूप मोठ्या संख्येने असल्याने आणि किंमतीही तुलनेत कमी असल्याने सिडकोच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.


अॅप नेमकं कसं?

आॅनलाईन नोंदणी, अर्ज भरण्यासाठी इच्छुकांना सध्या सिडकोच्या संकेतस्थळावर जावं लागतं. पण लवकरच इच्छुकांना एका क्लिकवर लाॅटरीसाठी नोंदणी आणि अर्जविक्री-स्वीकृती करता येणार आहे. त्यासाठी सिडकोकडून अॅप तयार केलं जात असून हे अॅप येत्या आठवड्याभरात कार्यन्वित होण्याची शक्यता आहे. हे अॅप नेमका कसं असेल, त्याचं नाव काय असेल, ते कसं काम करेल यासंबंधीची माहिती मात्र सिडकोकडून गुलदस्त्यात ठेवली जात आहे. त्यामुळे ८ दिवसांनंतरच हे अॅप नेमकं कसं असेल हे समजेल.


पहिलंच प्राधिकरण

लाॅटरीसाठी अॅप तयार करणारी सिडको ही पहिली सरकारी यंत्रणा ठरणार आहे हे महत्त्वाचं. कारण म्हाडाकडून गेल्या कित्येक वर्षांपासून आॅनलाईन लाॅटरी काढली जात आहे. लाॅटरीच्या तंत्रज्ञानात वेळोवेळी बदल केले जात आहेत. मात्र खास लाॅटरीसाठी अॅप तयार करावा हा विचार केवळ सिडकोनं पुढं आणला असून आता तो लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.



हेही वाचा-

सिडकोकडूनच महारेराचं उल्लंघन, नोंदणीशिवाय काढली जाहिरात

Exclusive: सिडकोचं घर अडीच लाखांनी स्वस्त मिळणार!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा