Advertisement

'एसआरए' झालं डिजिटल, झोपडपट्टीवासीयांच्या फेऱ्या आता बंद!

'एसआरए'च्या आॅनलाईन कारभारामुळे झोपडपट्टीवासीयांना आता 'एसआरए' कार्यालयाच्या फेऱ्या मारायची गरज उरणार नाही, असा दावा 'एसआरए'कडून केला जात आहे. यामुळे 'एसआरए'तील भ्रष्टाचाराला आळा बसेल, असंही म्हटलं जात आहे.

'एसआरए' झालं डिजिटल, झोपडपट्टीवासीयांच्या फेऱ्या आता बंद!
SHARES

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) डिजिटल झालं असून 'एसआरए'चा सर्व कारभार आता आॅनलाईन करण्यात येणार आहे. या आॅनलाईन कारभारामुळे झोपडपट्टीवासीयांना आता 'एसआरए' कार्यालयाच्या फेऱ्या मारायची गरज उरणार नाही, असा दावा 'एसआरए'कडून केला जात आहे. यामुळे 'एसआरए'तील भ्रष्टाचाराला आळा बसेल, असंही म्हटलं जात आहे.


नव्या वेबसाईटचं उद्घाटन

त्यानुसार 'एसआरए'ने नवीन वेबसाईट तयार केली असून जुन्या वेबसाईटच्या तुलनेत नवी वेबसाईट अधिक आकर्षक, हाताळण्यास सोपी आणि 'एसआरए' प्रकल्पाची संपूर्ण माहिती देणारी असल्याचं ;एसआरए'कडून सांगण्यात येत आहे. अशा नव्या वेबसाईटचं उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.


कम्प्युटर सिस्टिमही विकसित

या वेबसाईट बरोबरच 'एसआरए'ने नवी कम्प्युटर सिस्टिमही विकसित केली आहे. या सिस्टिमच्या माध्यमातून 'एसआरए'चा सर्व कारभार आॅनलाईन आणि पारदर्शक करण्यात आला आहे.


सर्वकाही आॅनलाईन

जीआयएस वेब पोर्टलच्या माध्यमातून आता झोपडपट्टीवासीयांना 'एसआरए'चा प्रस्ताव सादर करण्यापासून ते घराची लाॅटरी काढून ताबा देण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे. या वेबसाईटवर झोपडपट्ट्याखालील जागेच्या मालकी हक्काबाबतची माहिती तात्काळ उपलब्ध झाली असून प्रकल्पाचे, झोपडपट्ट्यांचे नकाशे आणि इतर माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फाईलची सद्यस्थिती अर्थात आपली फाईल सध्या कोणत्या विभागात आहे हे देखील झोपडपट्टीवासीयांना आॅनलाईन समजणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 'एसआरए'चा कारभार डिजिटल झाल्याने मानवी हस्तक्षेप होणार नसल्याने यापुढे झोपडपट्टीवासीयांची फसवणूक होणार नसल्याचा दावाही एसआरएकडून केला जात आहे.



हेही वाचा-

तोंड बंद ठेवण्यासाठी बिल्डरने दिली 11 कोटींची लाच?

बिल्डरांनो, एसपीपीएलकडून कर्ज घ्याल, तर एसआरए प्रकल्प मार्गी लावाच


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा