SHARE

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'परवडणाऱ्या दरात घर' या योजनेवर कोणतेही परिणाम होऊ नयेत, यासाठी केवळ मुंबईतील मोकळ्या जागेवरील रेडीरेकनर दराच्या वाढीस एक महिन्याची स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून रेडी रेकनरच्या दरात सरासरी 5.86 टक्क्यांची वाढ केली होती. तर मुंबईत रेडी रेकनरच्या दरात 3.95 टक्के वाढ केल्यामुळे घरांच्या किंमती वाढल्या होत्या. नोटाबंदीमुळे बांधकाम क्षेत्राला मोठे नुकसान सहन करावे लागले आणि रेडी रेकनरच्या वाढीमुळे घरांच्या किंमतींमध्येही वा़ढ झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना आणि घर खरेदी करणाऱ्यांना एका महिन्याचा दिलासा मिळाला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या