कोल्ड प्ले - एमएमआरडीएचा लेखाजोखा

 Pali Hill
कोल्ड प्ले - एमएमआरडीएचा लेखाजोखा

मुंबई - बीकेसीतल्या एमएमआरडीए मैदानावर कोल्ड प्ले या ब्रिटिश बँडचा शानदार कार्यक्रम रंगला. आता एमएमआरडीएनं या कार्यक्रमाची झाडाझडती सुरू केलीय. कार्यक्रमासाठी भाड्यानं घेण्यात आलेल्या 1 लाख 70 हजार चौरस मीटर जागेची एमएमआरडीएनं पाहणी केली. मैदानाचं काही नुकसान झालंय का, याचीही तपासणी केल्याची माहिती एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.

कोल्ड प्ले कार्यक्रमासाठी लागणारं सामान ने-आण करताना मैदान वा परिसरात खड्डे पडलेत का, विद्युत खांब आणि इतर मालमत्तेचं नुकसान झालंय का याचीही पाहणी करण्यात येतेय. यासंबंधी अहवाल दोन दिवसांत सादर करण्यात येतोय. या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलंय.

Loading Comments