Advertisement

भारत-चीन वादामुळं मुंबईतील 'हे' कंत्राटही चीनकडून निसटलं


भारत-चीन वादामुळं मुंबईतील 'हे' कंत्राटही चीनकडून निसटलं
SHARES

चीनने भारताशी लडाख सीमेवर गलवान खोऱ्यात आगळीक केल्यानंतर संपूर्ण भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात २० भारतीय सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. परिणामी अनेकांनी चायनाच्या वस्तू बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतानं चीनला आणखी एन मोठा दणका दिला आहे. मुंबईतील मोनोरेलसाठीचं चिनी कंपनीला दिलेलं अंतिम टप्प्यातील कंत्राट एमएमआरडीएनं रद्द केलं आहे.

मुंबई मोनोरेल रॅकसाठी २ चिनी कंपन्यांना दिलेलं कंत्राट अंतिम टप्प्यात होतं. आता हे कंत्राट रद्द करण्यात आल्याचं समजतं. तसंच, हे कंत्राट भातरतीय कंपन्यांना दिलं जाऊ शकतं. यामध्ये BHEL आणि BEML या कंपन्यांची नावं चर्चेत आहेत. मुंबईतील महत्त्वाच्या अशा मोनो रेल प्रकल्पासाठी १० मोनोरेलचे रॅक्स तयार करायचे होते, केवळ रॅक्स तयार करणे नव्हे तर त्याचं डिझायनिंग आणि कमिशनिंग हे सर्व काम या दोन चिनी कंपन्यांना देण्यात येणार होतं. हे कंत्राट अंतिम टप्प्यात होतं.

या दोन्ही कंपन्यांकडून अटी आणि शर्थींमध्ये वारंवार बदल केले जावेत अशी विनंती करण्यात येत होती. या धर्तीवर हे कंत्राट आता चिनी कंपन्यांना मिळणार नसल्याची माहिती समोर येते आहे. 



हेही वाचा -

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद

Coronavirus Updates : यंदा पदवी परीक्षा होणार नाहीत?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा