वडाळ्यात शौचालयाचा मैला रस्त्यावर

 Mumbai
वडाळ्यात शौचालयाचा मैला रस्त्यावर
वडाळ्यात शौचालयाचा मैला रस्त्यावर
वडाळ्यात शौचालयाचा मैला रस्त्यावर
See all

वडाळा - पालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाला पालिकेनेच हरताळ फासल्याचे चित्र वडाळा पूर्व परिसरातल्या जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावर दिसत आहे. रस्त्यावर बसवण्यात आलेल्या फिरत्या शौचालयाxची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे स्थानिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गणेशनगर, शांतीनगर, कोरबा मिठागर आणि आनंदनगर येथील लोकवस्तीच्या तुलनेत शौचालयांची संख्या कमी आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी पालिकेच्या एफ-उत्तर विभागाकडे वारंवार शौचालयाची मागणी केली. त्यानुसार नागरिकांच्या सोयीसाठी सहा सीटरची पाच फिरती शौचालये रस्त्यालगत उभी करण्यात आली.

सुरुवातीला शौचालयात पाण्याची व्यवस्था असल्याने या शौचालयाचा उपयोग नागरिकांना होत होता. मात्र महिन्याभरातच या शौचालयांचा पाणीपुरवठा बंद झाला. पाण्याची व्यवस्था नसल्याने साफसफाई करणारे कर्मचारी देखील बंद झाले. मात्र याकडे महापालिका एफ उत्तर विभागाने दुर्लक्ष केले आहे, असे समाजसेवक संजय रणदिवे यांनी सांगितले.

मैला वाहून नेणाऱ्या वाहनांची सध्या अडचण आहे. त्यामुळे हा मैला रस्त्यावर पसरला आहे. लवकरच ही समस्या सोडवण्यात येईल. शौचालयासाठी लागणारे पाणी आणि साफसफाई कामगारांची व्यवस्था करण्यात येईल, असे पालिका एफ उत्तर विभागाच्या प्रशासकीय अधिकारी राजस शेळके यांनी सांगितले.

Loading Comments