Advertisement

महावितरणाच्या विजेने झगमगणार एलिफंटा


महावितरणाच्या विजेने झगमगणार एलिफंटा
SHARES

युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक वारसा लाभलेलं घारापुरी बेट मुंबईपासून जवळ असलेलं महत्त्वाचं पर्यटनस्थळ. हे पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असून यापूर्वी बेटावर पर्यटन विकास महामंडळातर्फे डिझेल विद्युत जनित्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येत होता. मात्र महावितरण विभागाच्या वीजेमुळे हे बेट झगमगणार आहे.


कोणाची उपस्थिती लाभणार?

मुंबईपासून जवळच असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटाच्या विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते यांच्यासह पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि उर्जा राज्यमंत्री मदन येरावार इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


राज्यातील सगळ्यात लांब वीजवाहिनी

महावितरणच्या भांडुप परिमंडळामार्फत एमएमआरडीएच्या आर्थिक सहाय्याने समुद्रतळांतर्गत 95 चौ. मी.ची 7.5 कि. मी. लांबीची 22 केव्ही उच्चदाब विदयुत वाहिनी टाकून बेटास वीजपुरवठा करण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच इतक्या लांबीची वीजवाहिनी समुद्रतळातून टाकण्यात आली आहे. महावितरण या भागात विज पोहोचवण्यात यशस्वी झालं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा