गोरेगावचा पादचारी पूल प्रवाशांसाठी सुरू

 Goregaon
गोरेगावचा पादचारी पूल प्रवाशांसाठी सुरू
गोरेगावचा पादचारी पूल प्रवाशांसाठी सुरू
गोरेगावचा पादचारी पूल प्रवाशांसाठी सुरू
See all

गोरेगाव - दोन महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असलेला इथला पादचारी पूल प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. पूर्वकडून पश्चिमेला तसंच रेल्वे फलाटावरून येणाऱ्या स्कायवॉकला हा पूल जोडतो. मात्र, पूल सुरू झाला तरी अजून त्यावरील छप्पराचं काम पूर्ण झालेलं नाही.

हा पूल बंद असल्यानं रेल्वेचे तिकीट वा पास नसणाऱ्यांना गोरेगाव पूर्व-पश्चिम जा ये करण्यासाठी महापालिकेच्या भुयारी मार्गाचा वापर करावा लागत होता. तो रस्ता लांब पडत असल्यामुळे नाराजी होती. मात्र आता हा पूल सुरू झाल्यामुळे पादचाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. सध्या तरी या पुलावर फेरीवाले बसत नसल्यामुळे चालायला भरपूर जागा आहे, असं एक प्रवासी अनिता चव्हाण यांनी सांगितलं. तर, पुलावर पत्रे लावण्याचं काम अजून व्हायचं आहे. लवकरच ते पूर्ण केलं जाईल, असं स्टेशन मास्टर दिनेश धोरजे यांनी स्पष्ट केलंय.

Loading Comments