Advertisement

Video: पहा, असं असेल नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ

या व्हिडीओमध्ये विमानतळाच्या डिझाईनपासून अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. या विमानतळाचं डिझाईन कमळाच्या फुलाप्रमाणे करण्यात आलं आहे.

SHARES

बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (Navi Mumbai International Airport) अंतिम डिझाईन लाँच करण्यात आलं आहे. जीव्हीके समुहाने (GVK Group) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कसं असेल आणि त्यात काही सोयी सुविधा असतील याचा एक व्हिडीओ जारी केला आहे.

या व्हिडीओमध्ये विमानतळाच्या डिझाईनपासून अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. या विमानतळाचं डिझाईन कमळाच्या फुलाप्रमाणे करण्यात आलं असून जहा हदीद या आर्किटेक्चरल कंपनीने हे डिझाईन केलं आहे 

या विमानतळात एकमेकांशी जोडलेले ३ टर्मिनल असून केंद्रस्थानी सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स असणार आहे. विमानतळाला पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांनी प्रवेशद्वार असणार आहे. विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या असतील. त्यामुळे विमानांची लँडिंग आणि टेकऑफ एकाचवेळी करता येऊन विमानांची अधिक सोय होईल आहे.

या भागातील प्रवाशांना विमानतळापर्यंत पोहचण्याची वेगवान वाहतूक व्यवस्था असावी म्हणून एक्सप्रेस हायवेपासून उपनगरीय रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतुकीचीही सुविधा असणार आहे. या विमानतळात ८८ चेक इन पॉईंट्स असणार आहेत. याशिवाय २६ इमिग्रेशन डेस्क, २९ एरोब्रिजेसही असणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा