Advertisement

पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकातील पॉड हॉटेलचं उद्घाटन होण्याची शक्यता

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मार्फत तयार करण्यात आलेले पॉड हॉटेल सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकातील पॉड हॉटेलचं उद्घाटन होण्याची शक्यता
(File Image)
SHARES

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मार्फत तयार करण्यात आलेले पॉड हॉटेल सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात हे पहिलं पॉड हॉटेल सुरू होणार आहे. बुधवारी या हॉटेलचं उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वृत्तानुसार, पॉड हॉटेलसह चर्नी रोड आणि ग्रँट रोड रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रोड ओव्हर ब्रिजचंही उद्घाटन होणार असल्याची शक्यता आहे.

स्लीपिंग पॉड्स हे जपानमधील आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे एक लोकप्रिय वैशिष्ट्य आहे. पॉड्स प्रवाशांना पारंपारिक हॉटेलपेक्षा खूपच स्वस्त दरात मुक्काम करण्याची सुविधा देतं. जपानी स्टाईलच्या या पॉड हॉटेलमध्ये अनेक लहान कॅप्सूल किंवा पॉड्स असलेली एक इमारत आहे. जीथे प्रवाशांना रात्रभर मुक्काम करता येईल. स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर वेटिंग रूमसचा वापर यासाठी केला गेला आहे. सर्वात स्वस्त पॉडची किंमत १२ तासांसाठी ९९९ रुपये असेल.

पॉड्समध्ये इतर मूलभूत सुविधांव्यतिरिक्त वायफाय, एअर कंडिशनिंग, की कार्ड ऍक्सेस आणि सीसीटीव्ही पण असणार आहे. मुंबई सेंट्रल इथं ४८ पॉड्स असतील ज्यात ३० क्लासिक पॉड्स, ७ फक्त महिलांसाठी, १० खाजगी पॉड्स आणि एक अपंगांसाठी अनुकूल पॉड आहे. यात ५ शॉवर युनिट असण्याचीही शक्यता आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा