सरतं वर्ष पायाभूत सुविधांच्या शुभारंभाचं

मुंबई - वेगवेगळ्या घटनांसह पायाभूत सुविधांच्या दृष्टीनंही 2016 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं ठरलं. या वर्षात तब्बल 80 हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ अर्थात भूमीपूजन झालं. यात पाच मेट्रो मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, कलाननगर जंक्शन उड्डाणपूल आणि कुर्ला-वाकोला उन्नत मार्ग अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

भूमिपूजन आणि कामाचा शुभारंभ झालेले पाच मेट्रो प्रकल्प

 •  दहिसर (प) ते डीएननगर मेट्रो - 2- अ 18.5 किमी
 • कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो - 3, 33.5 किमी
 • वडाळा-घाटकोपर-मुलूंड-ठाणे-कासारवडवली मेट्रो-4, 32 किमी
 • डीएननगर ते मानखुर्द मेट्रो-2-ब, 23.5
 • अंधेरी (पू) ते दहिसर (पू) मेट्रो-7
 • 61, 289 कोटी खर्च करत 124 किमी लांबीच्या मेट्रोचे जाळे विणले जणार
 • या पाच मेट्रो मार्गांवर 114 मेट्रो स्थानके
 • हे पाचही मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यास 50 लाखांहून अधिक मुंबईकरांना फायदा होणार
 • रेल्वेवरील ताण 30 ते 40 टक्क्यांनी कमी होणार
 • सध्या 1 चौरस मीटर जागा 12 प्रवाशांसाठी उपलब्ध होते तिथे हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यास 1 चौरस मीटर जागा 7 प्रवाशांसाठी उपलब्ध होणार
 • रस्त्यांवरील वाहने 35 ते 40 टक्क्यांनी कमी होणार
 • प्रवासाच्या वेळेत 30 ते 50 मिनिटांची बचत होणार
 • दररोज 10 लाख लिटर इतक्या इंधनाची बचत होणार

अनेक वर्षे रखडलेल्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई आणि नवी मुंबईला थेट जोडणाऱ्या एमटीएचएल प्रकल्पाचंही यंदा भूमीपूजन करण्यात आलं. त्यामुळे आता हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ( शिवडी-न्हावा-शेवा सागरी सेतू )

 • 22 किमी लांबीचा सहा मार्गिकेचा खर्च 17, 843 कोटी
 • बीकेसीतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी या दोन प्रकल्पांचा शुभारंभ वर्षाअखेरीस करण्यात आला
 • कलानगर जंक्शन उड्डाणपूल खर्च 227 कोटी
 • कुर्ला-वाकोला उन्नत मार्ग 155.70 कोटी

तब्बल 80 हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ यंदा झाला असला तरी हे प्रकल्प पूर्ण होण्यास पाच ते सात वर्षांचा काळ लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या भूमीपूजनामुळे मुंबईकर खूश असले तरी मुंबईकरांना खरा दिलासा मिळणार आहे तो पाच ते आठ वर्षांनंतरच.

Loading Comments