खार-वांद्रे दरम्यान फाटक दोन दिवस बंद

 Khar
खार-वांद्रे दरम्यान फाटक दोन दिवस बंद

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या खार ते वांद्रे दरम्यान असलेले फाटक दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. तांत्रिक बिघाड आणि आवश्यक दुरुस्तीसाठी मंगळवार रात्री 12 वाजल्यापासून ते गुरुवार रात्री 12 वाजेपर्यंत हे काम सुरू असणार आहे. या कामामुळे गेट नंबर 19 दोन दिवस बंद राहणार आहे. दोन दिवसात त्या रस्त्याने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांनी सबवेचा वापर करावा किंवा अन्य मार्गांचा पर्याय निवडावा, अशी माहिती पश्चिम रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Loading Comments