Advertisement

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात, १२ प्रमुख सामंजस्य करारांवर होणार स्वाक्षरी

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत राज्य सरकारतर्फे सोमवार १५ जून रोजी १२ मोठ्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येणार आहे

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात, १२ प्रमुख सामंजस्य करारांवर होणार स्वाक्षरी
SHARES

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत राज्य सरकारतर्फे सोमवार १५ जून रोजी १२ मोठ्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. या सामंजस्य कराराद्वारे अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर व भारतातील लहान-मोठे उद्योग अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया व इतर क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत.

सोमवार सायंकाळ ६.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यूएसए, चायना, साऊथ कोरिया, सिंगापूर व भारतातील अनेक उद्योग समूह यांच्या दरम्यान मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करतील. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई , उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित राहतील. थेट परदेशी गुंतवणुकीसाठी शेर्पा म्हणून प्रधान सचिव  भूषण गगराणी, उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी – डॉ. पी. अनबलगन हे देखील उपस्थित असणार आहेत.

हेही वाचा - द्योग क्षेत्रातील संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात 

या कार्यक्रमात मुख्यमंत्री इतर देशांचे राजदूत व जागतिक उद्योग संघटनांना संबोधित करणार आहेत यासह वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज (डब्ल्यूएआयपीए) आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) सह द्विपक्षीय भागीदारी करारावर स्वाक्षरी होणार आहे.  

या करारांमुळे मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात होईल. त्यात प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर, ४० हजार एकराहून अधिक क्षेत्रफळाची लँडबँक, लवचिक भाड्याने आणि किंमतीची रचना, महापरवाना च्या माध्यमातून  ४८ तासात स्वयंचलित परवानग्या, विशेष कामगार संरक्षण मार्गदर्शन व स्थानिक कौशल्य यासाठी कामगार ब्युरो सारखे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहेत.

६० हजार उद्योग सुरू

लाॅकडाऊनमुळे जगभरातील उद्योग व व्यापार ठप्प झाले आहेत. महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेवर देखील विपरित परिणाम झाला आहे. तरीही टाळेबंदीत प्रयत्नपूर्वक राज्यातील ६० हजारपेक्षा अधिक उद्योग यशस्वीरित्या पुन्हा सुरू झाले आहेत. त्यातून जवळपास १५ लाख  कामगार रुजू झाले आहेत. 

या टाळेबंदीत राज्याला परकीय गुंतवणुकीची  संधी उपलब्ध झाली आहे, गुंतवणूक, निर्यात, स्पर्धा व व्ययसाय सुलभता या घटकांच्या आधारे राज्यातील उपलब्धतेमुळे दक्षिण पूर्व आशियामध्ये त्यांच्या पुरवठा साखळीत विविधता आणू पाहणाऱ्या उद्योगांनी उत्तम गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून रोजगाराचाही प्रश्न सुटणार आहे.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाने उद्योगांचं जाळं विणून राज्यात समृद्धी यावी- उद्धव ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा