Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

समृद्धी महामार्गाने उद्योगांचं जाळं विणून राज्यात समृद्धी यावी- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं काम करताना उद्योग व्यवसायाचं जाळं विणून व्यावसायिकांना, स्थानिकांना त्यांच्या भागातच सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

समृद्धी महामार्गाने उद्योगांचं जाळं विणून राज्यात समृद्धी यावी- उद्धव ठाकरे
SHARES

राज्यात नवीन उद्योग आणताना त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं काम करताना उद्योग व्यवसायाचं जाळं विणून व्यावसायिकांना, स्थानिकांना (uddhav thackeray favours decentralisation of new industries to control population density) त्यांच्या भागातच सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. २४ जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा- तर पुन्हा लाॅकडाऊन करावं लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा

यावेळी मुख्यमंत्री  म्हणाले, महाराष्ट्रातील ज्या भागात उद्योगाचा पट्टा आहे तिथं लोकसंख्येची घनता जास्त आहे. याच पट्ट्यात लॉकडाऊन करावं लागत आहे. ही बाब कोरोना संकटाच्या निमित्ताने लक्षात आली आहे. त्यामुळे यापासून धडा घेत राज्यात नवीन उद्योग आणताना त्याचं विकेंद्रीकरण करणं आवश्यक आहे. समृद्धी महामार्गाची उभारणी करताना ही बाब लक्षात घेऊन उद्योगनिहाय टापू उभे करावेत. त्या भागात दळणवळणाची सुविधा उभारतानाच या उद्योगांना आवश्यक असणाऱ्या इतर सुविधा त्याच भागात देता येतील अशी व्यवस्था करावी.

भौगोलिक परिस्थितीनुसार उद्योगनिहाय टापू करतानाच त्या भागाचा विकास करतानाच समृद्धी महामार्गावर ठराविक अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. या महामार्गावर वेगवेगळे नोड करताना उद्योग, कृषी, पर्यटन यानुसार भौगोलिक परिस्थितीनुरूप नियोजन करण्यात यावं, असंही त्यांनी सांगितलं. वस्त्रोद्योगाला अधिक चालना मिळण्यासाठी  प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी  दिले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ७०१ कि.मी. लांबीच्या महामार्गासाठी ८३११.१५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गामुळे १० जिल्हे थेट जोडणार असून २४ जिल्ह्यांचे रस्ते जोडले जाणार आहेत. त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे. जेएनपीटी सारखे बंदर देखील जवळ येणार आहे. वेगवेगळ्या नोडमध्ये उद्योगांचे नियोजन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी राधेश्याम मोपलवार यांनी सादरीकरण केलं.

हेही वाचा- केंद्राकडे मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची सातत्याने मागणी- उद्धव ठाकरे 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा