Advertisement

आता मानखुर्द ते ठाण्याचा प्रवास अवघ्या ५ मिनिटात करता येणार

मानखुर्द-ठाणे उड्डाणपुलाच्या शेवटच्या गर्डरचे काम पूर्ण, १५ फेब्रुवारीपासून प्रवाशांसाठी खुले होण्याची शक्यता

आता मानखुर्द ते ठाण्याचा प्रवास अवघ्या ५ मिनिटात करता येणार
SHARES

आता मानखुर्द ते ठाण्याचा प्रवास अवघ्या ५ मिनिटात करता येणार आहे. मानखुर्द आणि ठाण्याला जोडणारा हा पूल १५ फेब्रुवारीपासून सेवेत दाखल होऊ शकेल अशी माहिती एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्पातील मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावरील छेडा नगर जंक्शन परिसरातील १,२३५ मीटरच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवारी रात्री या उड्डाणपुलातील शेवटचा गर्डर (तुळई) बसविण्यात आला.

आता उर्वरित कामे पूर्ण करून हा पूल १५ फेब्रुवारीपासून वाहतूक सेवेत दाखल करण्याची तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरु केली आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास छेडा नगर येथील अत्यंत गंभीर अशी वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. तर मानखुर्द – ठाणे प्रवासातील ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी कमी होऊ शकेल.

पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास छेडा नगर येथील अत्यंत गंभीर अशी वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. तर मानखुर्द – ठाणे प्रवासातील ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी कमी होऊ शकेल.

पूर्वमुक्त मार्गावरून सुसाट येणाऱ्या वाहनांना छेडा नगर जंक्शन येथे वाहतूक कोंडीत अडकावे लागते. त्यामुळे एमएमआरडीएने छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत छेडा नगर येथे तीन उड्डाणपूल आणि एक सब-वे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिला तीन मार्गिकेचा पूल ६८० मीटर लांबीचा असून तो शीव आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे. दुसरा दोन मार्गिकेचा १,२३५ मीटर लांबीचा उड्डाणपूल मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे.

तिसरा ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्त्याला जोडण्यात आला आहे. यासाठी २४९.२९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. यापैकी ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल मार्च २०२२ मध्ये वाहतुकीस खुला झाला आहे.

सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पास हा उड्डाणपूल जोडण्यात आला असून हा पूल खुला झाल्याने छेडा नगर परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होत आहे. छेडा नगर उड्डाणपुलासह ५१८ मीटर लांबीच्या आणि ३७.५ मीटर रुंदीच्या सब-वेचा पहिला टप्पाही पूर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा