Advertisement

म्हाडाचेही अच्छे दिन


म्हाडाचेही अच्छे दिन
SHARES

मुंबई - जुन्या नोटा स्वीकारत सेवाशुल्क वसुल करण्याकडे म्हाडानंही भर दिलाय. त्यानुसार 8 नोव्हेंबरपासून म्हाडाकडून सेवाशुल्क वसुली सुरुये. "शनिवार-रविवार आणि सोमवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सेवाशुल्क वसुली सुरू असेल," अशी माहिती म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी मुंबई लाईव्हला दिली. "म्हाडाचे रेन्ट कलेक्टर सोसायट्यांमध्ये जाऊन सेवाशुल्काची रक्कम जुन्या नोटांच्या रुपात स्वीकरत आहेत. त्यास सोसायट्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत सेवाशुल्क वसुली करण्यात येणाराय," असंही झेंडे यांनी स्पष्ट केलं.

"मुंबईतील म्हाडा सोसायट्यांकडे कोट्यवधींचे सेवाशुल्क थकीत आहे. अभय योजना राबवून, निष्कासनाचा इशारा दिल्यानंतरही सोसायट्या काही सेवाशुल्क भरत नसल्याचं चित्र आहे. पण आता सोसायट्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सेवाशुल्क वसुल होईल," असा विश्वास झेंडे यांनी व्यक्त केला. दरम्यान "सेवाशुल्काची एकूण रक्कम मंगळवारीच समजेल," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा