म्हाडा विजेत्यांसाठी खूशखबर!

 Pali Hill
म्हाडा विजेत्यांसाठी खूशखबर!

मुंबई - म्हाडाच्या 2016 च्या सोडतीतील विजेत्यांची घरे हस्तांतरीत करण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. आतापर्यंत 962 पैकी 450 विजेते पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या 111 विजेत्यांना नुकतेच ऑफर लेटर पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आता घराची रक्कम भरल्यावर विजेत्यांना घराचा ताबा मिळणार आहे. दरम्यान 962 पैकी 390 घरांना ओसी मिळालेली आहे. सोडत झाल्यानंतर घराचा ताबा मिळण्यास बराच काळ लागत असल्याने विजेत्यांमध्ये मोठी नाराजी असते. पण यंदा म्हाडाने काही महिन्यातच ताबा देण्यास सुरू केल्याने विजेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Loading Comments