Advertisement

संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी म्हाडाचा 'इतका' निधी

मुंबईत म्हाडाच्या ५६ संक्रमण शिबिरांमध्ये २१ हजार १३५ गाळे आहेत. अनेक वर्षांपासून निधी मिळत नसल्याने या संक्रमण शिबिराची अवस्था फार वाईट झाली होती.

संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी म्हाडाचा 'इतका' निधी
SHARES

संक्रमण शिबीरांच्या दुरुस्तीसाठी म्हाडाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला १५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून संक्रमण शिबिरांची रखडलेली दुरूस्ती मार्गी लागणार आहे. दुरूस्ती होणार असल्याने येथे राहणाऱ्या रहिवाशांनाही दिलासा मिळणार आहे. 

मुंबईत म्हाडाच्या ५६ संक्रमण शिबिरांमध्ये २१ हजार १३५ गाळे आहेत. अनेक वर्षांपासून निधी मिळत नसल्याने या संक्रमण शिबिराची अवस्था फार वाईट झाली होती. मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात बैठका घेऊन संक्रमण शिबीरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. म्हाडाने सरकारकडे जुन्या इमारतींच्या दुरूस्तीसाठी २०० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने म्हाडाला १०० कोटी रुपये दिले होते. 

म्हाडाने आता संक्रमण शिबीरांच्या दुरुस्तीसाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला १५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या निधीतून संक्रमण शिबीरातील इमारतींची डागडूजी, गळती, प्लास्टर, रंगकाम, पॅसेजमधील कामे, लादीकरण अशी कामे मार्गी लागणार आहेत. मुंबई उपनगरातील १० ठिकाणच्या संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी हा निधी वापरला जाणार असल्याची माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.



हेही वाचा  -

वाहनचालकांनो सावधान! दंड न भरल्यास माराव्या लागणार कोर्टाच्या फेऱ्या

तानसा जलवाहिनी झाली अतिक्रमणमुक्त, 'एवढी' अतिक्रमणं हटवली




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा