Advertisement

तानसा जलवाहिनी झाली अतिक्रमणमुक्त, 'एवढी' अतिक्रमणं हटवली

अतिक्रमणं हटवल्यामुळे तानसा जलवाहिनीलगतचा पाचशे मीटर लांबीचा परिसर मोकळा झाला आहे. तसंच या ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकामे निर्माण होऊ नयेत म्हणून सुरक्षा भिंत बांधण्यात येत आहे.

तानसा जलवाहिनी झाली अतिक्रमणमुक्त, 'एवढी' अतिक्रमणं हटवली
SHARES

सांताक्रुझ पूर्व येथील तानसा जलवाहिनीलगत असलेली तब्बल ११० अनधिकृत बांधकामं हटविण्यात आली आहेत. मागील ५ दिवसांपासून ही अतिक्रमणं तोडण्याचं काम सुरू होतं. तानसा जलवाहिनीलगतचा परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. 

अतिक्रमणं हटवल्यामुळे तानसा जलवाहिनीलगतचा पाचशे मीटर लांबीचा परिसर मोकळा झाला आहे. तसंच या ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकामे निर्माण होऊ नयेत म्हणून सुरक्षा भिंत बांधण्यात येत आहे. जलवाहिनीचा परिसर संवेदनशील असल्याने या ठिकाणी अतिक्रमण असणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालिकेने सांताक्रुझ, विलेपार्ले या हद्दीतील तानसा जलवाहिनीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे तोडली. 

कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी शंभर पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष तुकडी येथे दिवसरात्र तैनात होती. त्याचबरोबर महापालिकेचे शंभर कर्मचारी, अधिकारीदेखील कार्यरत होते. चार जेसीबी, पाच डम्परच्या सहाय्याने येथील अतिक्रमणे हटवण्यात आली. हेही वाचा -

मेट्रो भवन, कारशेड मुंबईसाठी ठरणार धोकादायक

नोव्हेंबर संपत आला तरी मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा कायम
Read this story in English
संबंधित विषय