Advertisement

वाहनचालकांनो सावधान! दंड न भरल्यास माराव्या लागणार कोर्टाच्या फेऱ्या

अनेक वाहनचालक दंड भरण्यास टाळाटाळ करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा वाहनचालकांविरोधात आता वाहतूक पोलिस कठोर कारवाई करणार आहेत.

वाहनचालकांनो सावधान! दंड न भरल्यास माराव्या लागणार कोर्टाच्या फेऱ्या
SHARES

वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ई चलन पाठवून दंड भरण्यास सांगितलं जातं. मात्र, अनेक वाहनचालक दंड भरण्यास टाळाटाळ करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा वाहनचालकांविरोधात आता वाहतूक पोलिस कठोर कारवाई करणार आहेत. दंड न भरलेल्या वाहनचालकांची प्रकरणे उच्च न्यायालयात नेण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे नियम तोडणं अशा वाहनचालकांना चांगलंच महागात पडणार आहे. 

एका आठवड्यात १०,५०० वाहनचालकांना एसएमएस पाठवून न्यायालयीन कारवाईची सूचना वाहतूक पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या इशाऱ्यानंतर अनेक वाहनचालकांनी दंड भरण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. ई चलन आलेले बहुतांशी वाहनचालक दंड भरण्याबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयीन कारवाईचा इशारा दिला आहे. मागील आठवड्यात ज्या वाहनांवर ५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा दंड भरणं बाकी आहे अशा वाहनचालकांना पोलिसांनी एसएमएस पाठवून १५ नोव्हेंबपर्यंत दंड न भरल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. 

एसएमएस मिळताच अनेक वाहचालकांनी दंड भरण्यास सुरूवात केली.  दंड वसुलीला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याचं, एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. ज्यांच्याकडं दंडाची रक्कम २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशी प्रकरणे न्यायालयात पाठविण्याचा निर्णय प्राधान्याने घेतला जाईल, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

 ७५२ परवाने होणार रद्द

तीनपेक्षा अधिक वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ७५२ वाहन चालकांचा परवाना निलंबित करावा, अशी शिफारस मुंबई वाहतूक पोलिसांनी आरटीओला केली आहे. यातील काही वाहन चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. भरधाव वेगाने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइल वापरणे, उलट दिशेने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे अशाप्रकारे मुंबईत ११ हजार वाहन चालकांनी नियमांचं उल्लंघन केलं होतं. यापैकी ७५२ जणांनी तीनपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं आहे. हेही वाचा -

तानसा जलवाहिनी झाली अतिक्रमणमुक्त, 'एवढी' अतिक्रमणं हटवली

मेट्रो भवन, कारशेड मुंबईसाठी ठरणार धोकादायक
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा