Advertisement

सुवर्णसंधी! म्हाडाची लवकरच ४००० घरांसाठी सोडत

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) लवकरच मुंबईत ४००० घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.

सुवर्णसंधी! म्हाडाची लवकरच ४००० घरांसाठी सोडत
SHARES

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) लवकरच मुंबईत ४००० घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. नव्या वर्षात साधारण जुलै महिन्यात ही सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. मुंबईत घर घेणाऱ्यांचं स्वप्न आता लवकरच पुर्ण होणार आहे.

नव्या सोडतीमध्ये नागरिकांना मोठ्याप्रमाणावर गोरगाव परिसरात घरे खरेदी करता येतील. एकूण ४ हजार घरांपैकी १२३९ वन बीएचके सदनिका या अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध असणार आहेत. 

  • उन्नतनगर क्रमांक २ इथेही अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७०८ घरं असणार आहेत. 
  • अल्प उत्पन्न गटासाठी ७३६ घरे असणार आहेत. 
  • मध्यम उत्पन्न गटासाठी २२७ घरे उपलब्ध असणार आहेत. 
  • उच्च उत्पन्न गटामध्ये १०५ घरांचा समावेश असणार आहे.
  • याशिवाय, अँटॉप हिल, कन्नमवारनगर आणि दक्षिण मुंबईतील घरांचाही सोडतीमध्ये समावेश असेल.

राज्यात लागू करण्यात आलेल्या एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार विकासकांना आता गृहप्रकल्पांच्या सुविधा क्षेत्रात धार्मिक स्थळांचे बांधकाम करता येणार नाही. सुविधा क्षेत्राचा केवळ क्रीडांगण, बगिचा, शाळा, दवाखाना, अग्निशमन व प्रकल्पबाधितांच्या घरांच्या बांधकामासाठी वापर करणे बंधनकारक आहे.

सुविधा क्षेत्रात शाळा व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी तरतूद केली आहे. पूर्वी धार्मिक स्थळांच्या बांधकामाला परवानगी द्यावी, अशी मागणी होती. परंतु, सगळीकडे तशी बांधकामे होतील. त्यामुळे ती मान्य करण्यात आली नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा