Advertisement

म्हाडावासियांचे बेमुदत साखळी उपोषण


म्हाडावासियांचे बेमुदत साखळी उपोषण
SHARES

वांद्रे - म्हाडा वसाहतींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावावा यासाठी म्हाडा वसाहतीतील रहिवासी सोमवारपासून म्हाडा कार्यालयासमोरच बेमुदत साखळी उपोषणणाला बसले आहेत. हाऊसिंग स्टॉकच्या म्हाडाच्या निर्णयामुळे 2008 पासून पुनर्विकास ठप्प झालाय. त्यामुळे जिर्ण झालेल्या इमारतीत जीव मुठीत घेऊन रहिवासी राहत आहेत. पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी मोर्चे, आंदोलनं इतकंच काय पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही घेतला. पण म्हाडा आणि राज्य सरकार याकडे काही लक्ष देत नाही. त्यामुळे आता उपोषणाचं हत्यार रहिवाशांनी उपसलंय.
जोपर्यंत म्हाडा आणि सरकार पुनर्विकासासंदर्भात ठोस आश्वासनं देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा