Advertisement

म्हाडा लाॅटरीतील घरं महाग, मधू चव्हाणांचा म्हाडाला घरचा आहेर

म्हाडाच्या घरांच्या या किंमतीवरून इच्छुकांमध्ये नाराजी असून म्हाडावर मोठी टीकाही होत आहे. असं, असताना म्हाडाला मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनीच घरचा आहेर दिला आहे.

म्हाडा लाॅटरीतील घरं महाग, मधू चव्हाणांचा म्हाडाला घरचा आहेर
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १३८५ घरांसाठी १६ डिसेंबरला लाॅटरी फुटणार असली तरी या लाॅटरीतील घरांच्या किंमती एेकूनच अनेकांना घाम फुटला आहे. अगदी अत्यल्प गटापासून ते उच्च गटापर्यंतच्या पावणे सहा कोटीपर्यंतच्या घरांच्या किंमती भोवळ आणणाऱ्या आहेत. म्हाडाच्या घरांच्या या किंमतीवरून इच्छुकांमध्ये नाराजी असून म्हाडावर मोठी टीकाही होत आहे. असं, असताना म्हाडाला मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनीच घरचा आहेर दिला आहे.


उपाध्यक्षांना पत्र

मुंबई मंडळाच्या घरांच्या किंमती कमी केल्या असल्या तरी सध्याच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. त्यामुळं ही घर सर्वसामान्यांना परवडावी यासाठी घरांच्या किंमतींचा पुनर्विचार करावा असं पत्र मधू चव्हाण यांनी म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांना लिहिलं आहे. या पत्राची प्रत 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागली आहे.


घरांच्या किंमती कोटींवर

म्हाडाच्या घरांच्या किंमती गेल्या काही वर्षात भरसमाठ वाढल्या असून किंमती कोटीच्या कोटी उड्डाण घेत आहे. मागील लाॅटरीत जिथं मुंबई मंडळानं १ कोटी ९५ लाखांत घर विकलं तिथं हा विक्रम मोडत मुंबई मंडळानं यंदा चक्क ५ लाख ८० लाखांचं घर विक्रीस आणलं आहे. तर त्याचवेळी सर्वच गटातील घरांच्या किंमतीही सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर वाटत आहेत.


म्हाडावर टीका

दरम्यान किंमतीवरून गेल्या काही महिन्यांपासून म्हाडावर मोठी टीका होत आहे. तर गेल्या लाॅटरीतील परळमधील १ कोटी ९५ लाखांची २ घर आणि १ कोटी ४५ लाखांची २५ घरं विजेत्यांसह प्रतिक्षायादीवरील विजेत्यांनी नाकारल्याचं वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने प्रसिद्ध करत म्हाडाच्या महागड्या घराला कशी विजेते नापसंती देत आहे हे समोर आणलं होतं.


घरे महागच

त्यानंतर म्हाडाने नुकताच किंमतींच्या धोरणात बदल केला. म्हाडानं बांधलेल्या घरांच्या किंमती ३० टक्क्यांपर्यंत कमी केल्या. तर प्रीमियमच्या रुपानं मिळालेल्या घरांच्या किंमतीही ३० ते ६० टक्क्यांनी कमी केल्या. असं असलं तरी जेव्हा मुंबई मंडळाच्या घरांच्या लाॅटरीची जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हा उत्पन्न गट आणि घराचं क्षेत्रफळ लक्षात घेता ही घरं, म्हाडाची घर म्हणून सर्वसामान्यांना, इच्छुकांना महागच वाटत आहेत. त्यामुळं किंमती कमी करण्याचा म्हाडाचा दावा फोल ठरल्याचीही चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर आता मुंबई मंडळाचे सभापती, मधू चव्हाण यांनीच किंमतींचा विषय उचलून धरला आहे. १२ नोव्हेंबरला मधू चव्हाण यांनी उपाध्यक्षांंना पत्र लिहित चक्क घरांच्या किंमती कमी करण्याचं साकडं घालत म्हाडालाच घरचा आहेर दिला आहे. आता उपाध्यक्ष यावर काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.हेही वाचा-

म्हाडाचा दिवाळी धमाका; १६ डिसेंबरला फुटणार १३८४ घरांसाठी लॉटरी

गरीबांच्या तोंडाला म्हा़डाने पुसली पाने; अत्यल्प गटासाठी ४८० नव्हे तर केवळ ६३ घरंRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा