Advertisement

म्हाडा करणार कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास

मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कामाठीपुरा (Kamathipura) भागाचा आता पुनर्विकास होणार आहे.

म्हाडा करणार कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास
SHARES

मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कामाठीपुरा (Kamathipura) भागाचा आता पुनर्विकास होणार आहे.  इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यासंदर्भात तत्काळ प्रस्ताव सादर करून सर्वेक्षणाला सुरुवात करावी, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( state housing minister Jitendra Awhad) यांनी म्हाडाचा (mhada) विभागीय घटक असलेल्या आरआर मंडळास दिले आहेत. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयामध्ये आव्हाड यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी  कामाठीपुऱ्याचा समूह पुनर्विकास होणार असल्याचं सांगितलं. या वेळी गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासह म्हाडातील अधिकारी उपस्थित होते.

कामाठीपुरा  (Kamathipura) येथील ४० एकर जमिनीवर १ हजार इमारती आणि चाळी आहेत. या इमारती, चाळी १०० वर्षे जुन्या असून अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. ५० ते १८० चौ. फुटांच्या छोट्याशा खोलीत येथील रहिवाशी धोकादायक अवस्थेत राहत आहेत. म्हाडाने (mhada) सैफी-बुर्हाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टच्या (एसबीयूटी) धर्तीवर कामाठीपुरा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश आव्हाड यांनी दिले आहेत. 

म्हाडाच्या (mhada) मुंबईतील जुन्या वसाहतींचा समूह पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्यात यावेत तसेच पुनर्विकास करताना पुनर्विकसित इमारतींमध्ये मूळ रहिवाशांना देण्यात येणाºया पुनर्विकसित सदनिकांचे आकारमान निश्चित करण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. म्हाडाच्या अखत्यारीतील संक्रमण शिबिरातील भाडेकरूंचे विविध वर्गातील पात्रता निश्चितीसाठी बायोमेट्रिक सर्वेक्षण करावे, असेही आदेश आव्हाड यांनी दिले. 



हेही वाचा -

खड्डे बुजवण्यासाठी पालिका वापरणार नवे तंत्रज्ञान

मेट्रोसाठी पुन्हा कापली जाणार झाडे




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा