Advertisement

खड्डे बुजवण्यासाठी पालिका वापरणार नवे तंत्रज्ञान

खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी हॉटमिक्स (Hotmix), कोल्डमिक्स ( coldmix), डांबर (asphalt) वा खडीमिश्रित मिश्रण आणि पेव्हर ब्लॉक हे सगळे पर्याय अयशस्वी ठरले आहेत.

खड्डे बुजवण्यासाठी पालिका वापरणार नवे तंत्रज्ञान
SHARES

मुंबई (mumbai) तील रस्त्यांवर पडणारे खड्डे (Pits) बुजवण्यासाठी अाता मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग’चा (Ultra Thin White Topping) प्रयोग करणार आहे.  मुंबईतील ४० फुटांपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर हे तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजवण्यात येणार आहेत. या तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी हॉटमिक्स (Hotmix), कोल्डमिक्स ( coldmix), डांबर (asphalt) वा खडीमिश्रित मिश्रण आणि पेव्हर ब्लॉक हे सगळे पर्याय अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पालिकेने अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंगने खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते १० वर्षे टिकतात व त्यावर खड्डे पडत नसल्याने मुंबईतील डांबरी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम  सुरू आहे. २ वर्षांत ९० किमीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले. मात्र सिमेंट काँक्रीटसाठी अधिक खर्च आणि वेळही अधिक लागतो. मुंबईतील मोठे रस्ते वगळले तर ४५ टक्के रस्ते हे ६० फुटांच्या आतील आहेत. त्यामुळे या छोटय़ा रस्त्यांवर यंत्रसामग्री जात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे.  याआधी मुलंड पश्चिमेकडील विठ्ठल भाई पटेल रोड, गणेश गावडे रोड, ताजमहाल हॉटेलच्या मागे असलेला मांडलिक पथ या रस्त्यांवर व्हाइट टॉपिंगचा प्रयोग करण्यात आला आहे.

अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग (Ultra Thin White Topping)  तंत्रज्ञानात डांबरी रस्त्यावर १०० ते २०० मिमी जाडीचा सिमेंट काँक्रीटचा थर चढवतात. यासाठी पूर्ण सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यापेक्षा कमी खर्च येतो. ज्या रस्त्यांवर गाड्यांचं प्रमाण कमी आहे अशा रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. त्यामुळे रस्ते २४ ते ३६ तासांत वापरासाठी खुले होतात. कमी खर्च असलेल्या या तंत्रज्ञानामुळे रस्ते २० वर्षे आपला दर्जा टिकवून ठेवतात.

 हॉटमिक्स (Hotmix),डांबर (asphalt) वा खडीमिश्रित मिश्रण आणि पेव्हर ब्लॉक हे पर्याय तेवढे यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे पालिकेनेऑस्ट्रियातून आयात केलेल्या ‘मिडास’ या कोल्डमिक्स मिश्रणाचा प्रयोग केला. भर पावसातही खड्डे बुजवणारे हे तंत्रज्ञान आहे. मात्र १७० किलो दराचे हे मिश्रण पालिकेला परवडणारे नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी पालिकेने हे मिश्रण वरळीच्या प्लाण्टमध्ये तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी पालिकेला किलोला २२ रुपये खर्च आला. मात्र हे मिश्रणसुद्धा खड्डे बुजवण्यासाठी अपयशी ठरले. काही दिवसांनी खड्ड्यातून माती बाहेर येऊ लागली. त्यामुळे आता संपूर्ण डांबरी रस्त्यावरच व्हाइट टॉपिंगचा थर लावण्यात येणार आहे.


हेही वाचा -

मेट्रोसाठी पुन्हा कापली जाणार झाडे

महापालिकाही मोजणार मुंबईतलं प्रदूषणसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा