Advertisement

मेट्रोसाठी पुन्हा झाडं कापली जाणार, सरकारची भूमिका काय?

आता पुन्हा मेट्रोसाठी ५०८ झाडं कापली जाणार आहेत. एमएमआरडीए (mmrda) च्या मेट्रो-२ अ प्रकल्पासाठी इतक्या झाडांचा बळी जाणार आहे.

मेट्रोसाठी पुन्हा झाडं कापली जाणार, सरकारची भूमिका काय?
SHARES

मेट्रो कारशेड (Metro Carshed) साठी आरे काॅलनीतील (aarey Colony) झाडे तोडण्यावरून (tree cuting) मोठा वाद झाला होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Shiv Sena leader Aditya Thackeray) यांनी कारशेडविरोधात भूमिका घेतली होती. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेने कारशेडला स्थगितीही दिली होती. आता पुन्हा मेट्रोसाठी ५०८ झाडं कापली जाणार आहेत. एमएमआरडीए (mmrda) च्या मेट्रो-२ अ प्रकल्पासाठी इतक्या झाडांचा बळी जाणार आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत ही झाडं तोडण्यासाठीचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. यावर शिवसेना कोणती भूमिका घेते, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

तोडल्या जाणाऱ्या ५०८ झाडांपैकी १६२ झाडे (tree) मुळापासून कापण्यात येणार आहेत. तर ३४६ झाडांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे. अंधेरी पश्‍चिमेकडील डी. एन. नगर ते ओशिवरा नाल्यादरम्यान मेट्रो २ अ प्रकल्पाच्या बांधकामाआड येणारी ३२ झाडे कापली जाणार असून ९० झाडांचं पुनर्रोपण होणार आहे.  गोरेगाव पश्‍चिमेकडे गोरेगाव व बांगूरनगर स्थानकांच्या बांधकामात अडथळा ठरणारी २९ झाडे कापली जातील. तर  ८५ झाडांचे पुनर्रोपण केलं जाणार आहे. कांदिवली पश्‍चिम येथील लालजीपाडा ते महावीर नगरदरम्यानची ५३ झाडे कापली जाणार असून  २१ झाडांचं पुनर्रोपण होणार आहे. तर दहिसर पूर्व ते डी.एन. नगर दरम्यान ६४ झाडे कापणार असून ३७ झाडं पुनर्रोपित केली जाणार आहेत. लिंक रोड ते चारकोप कारडेपो, अथर्व कॉलेजजवळ मालाड पश्‍चिमेकडील ११ झाडे कापली जाणार असून ८६ झाडांचं पुनर्रोपण केलं जाईल. अशोक, नारळ, बाभूळ, सोनमोहर, उंबर, बदाम, आंबा, पिंपळ, वड, शेवर, जांभूळ, भेंडी, गुलमोहर, कडूनिंब, पेरू आदी झाडं मेट्रो-२ अ प्रकल्पासाठी तोडली जाणार आहेत. 

आरेतील (aarey Colony) वृक्षतोडीचा  (tree cuting) मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही चांगलाच गाजला होता.  वृक्षतोड करणाऱ्यांना राज्यात सत्ता येताच शिक्षा केली जाईल, असा इशारा शिवसेनेने यावेळी दिला होता. त्यानंतर सत्ता येताच शिवसेनेने कारडेपोला (Metro Carshed)स्थगिती दिली. त्यानंतर कारडेपोसाठी अन्य पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी नवी समिती नेमण्यात आली. तसंच सरकारने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (Mumbai Metro Rail Corporation) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.  या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएच्या वृक्षतोडीच्या प्रस्तावावर शिवसेना काय भूमिका घेते, याविषयी आता उत्सुकता लागली आहे. 


  • आता पुन्हा मेट्रोसाठी ५०८ झाडं कापली जाणार आहेत. 
  •  एमएमआरडीए (mmrda) च्या मेट्रो-२ अ प्रकल्पासाठी इतक्या झाडांचा बळी जाणार आहे.हेही वाचा -

अनधिकृत झोपड्यांवर कारवाईसाठी पालिकेकडून प्रथमच ड्रोनचा वापर

मध्य रेल्वे चिंतेत, 'एसी' लोकलचे प्रवासीच वाढेना...

मुंबईत २४ तासात पतीने पत्नीची हत्या केल्याच्या दोन घटना
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा