Advertisement

ड्रोन शोधणार बेकायदा झोपड्या, होणार कारवाई

अतिक्रमणांवर (Encroachment) कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) पहिल्यांदाच ड्रोनचा (Drone) वापर केला आहे.

ड्रोन शोधणार बेकायदा झोपड्या, होणार कारवाई
SHARES

 अतिक्रमणांवर (Encroachment) कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) पहिल्यांदाच ड्रोनचा (Drone) वापर केला आहे.  दहिसर नदीच्या (dahisar river) रूंदीकरणासाठी बोरीवलीच्या आर मध्य कार्यालयाने येथील झोपड्या हटवल्या. पोलीस (police) बंदोबस्तात पालिकेने ही कारवाई केली. ड्रोनच्या वापरामुळे झोपड्या तोडताना जमावावर नियंत्रण देखील ठेवता आले. 

पावसाळ्यात दहिसर नदी (dahisar river) धोक्याची पातळी ओलांडत असते. याचा मोठा फटका बोरीवली पूर्व येथील रहिवाशांना बसतो. त्यामुळे दहिसर नदीच्या किनाऱ्यावर संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या परीसरात झोपड्यांचं अतिक्रमण असल्याने हे काम १० वर्ष रखडलं होतं. पावसाळ्याअगोदर ही भिंत बांधण्याचं लक्ष्य पालिकेने (Mumbai Municipal Corporation) ठेवलं होतं. त्यामुळे मंगळवारी सकाळी या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. ९५ अनधिकृत बांधकामे पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली आहेत.९० पालिका कर्मचारी-अधिकारी या कारवाईसाठी घटनास्थळी तैनात होते.

हिसर नदीकिनारी (dahisar river) ७३८ फूट लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. यापैकी ३७७ फुटांची भिंत  बांधण्यात आली आहे. मात्र, नदीलगत असणाऱ्या संजयनगर व हनुमाननगर या परिसरातील ९५ अतिक्रमीत झोपड्यांमुळे उर्वरित ३६१ फूट लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम प्रलंबित होते. या कारवाईला स्थानिक झोपड्यांमधून तीव्र विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने ड्रोन कॅमेऱ्याचा (drone camera) वापर केला.

 मुंबईत २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत पश्चिम उपनगरातील नद्या भरून वाहिल्या होत्या. दहिसर नदीने  (dahisar river) धोक्याची पातळी ओलांडून आसपासचे परिसर पाण्याखाली गेले होते. बोरीवली पूर्व परिसरातून वाहणाºया या नदीलगतच्या परिसरांनाही पुराचा फटका बसला होता. त्यामुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील नदी-नाल्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र अनेक ठिकाणी नाले व नद्यांच्या परिसरात अतिक्रमण असल्याने रुंदीकरणाचे काम रखडले आहे. हेही वाचा - 

'एसी'साठी प्रवासी वाढवण्याचं मध्य रेल्वेसमोर मोठं आव्हान

मुंबईत २४ तासात पतीने पत्नीची हत्या केल्याच्या दोन घटना
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा