Advertisement

महापालिकाही मोजणार मुंबईतलं प्रदूषण

मुंबई महापालिकेनेही (mumbai air pollution) मुंबईतील प्रदूषणाचं स्तर मोजण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी एअर क्वालिटी माॅनिटरिंग मशीन बसवण्यात येणार आहे.

महापालिकाही मोजणार मुंबईतलं प्रदूषण
SHARES

बदलत्या हवामानासोबतच मुंबईतल्या हवेच्या प्रदूषणाचा (pollution in mumbai) स्तरही कमी जास्त होत असतो. सध्या काही खासगी संस्था तसंच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (mpc) मुंबईतील प्रदूषणाचा स्तर मोजला जातो. त्यांच्या जोडीनेच आता मुंबई महापालिकेनेही (mumbai air pollution) मुंबईतील प्रदूषणाचं स्तर मोजण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी एअर क्वालिटी माॅनिटरिंग मशीन बसवण्यात येणार आहे. 

हेही वाचा- अनधिकृत झोपड्यांवर कारवाईसाठी पालिकेकडून प्रथमच ड्रोनचा वापर

काही महिन्यांपूर्वी इकाॅनाॅमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) ने ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स (Global Liveability Index) सादर केला होता. या यादीत दिल्ली ६ अंकांनी घसरून ११८ वर मुंबई २ अंकांनी घसरून ११९ व्या स्थानावार पोहोचली होती. दिल्लीतील वाढतं प्रदूषण आणि गुन्ह्यांच्या संख्येमुळे तर संस्कृती आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात कमकुवत राहिल्याने मुंबईच्या स्थानात घसरण झाली होती. दिल्लीपाठोपाठ मुंबईतील वाढतं प्रदूषण (mumbai air pollution) देखील चिंतेचा विषय बनू लागला आहे.

हवेतील कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनोक्साइड, सल्फर डाय ओक्साईड, सल्फर ट्राय ओक्साईड, नायट्रिक आणि नायट्रोजन ओक्साईड, मिथेन आणि हवेत तरंगणारे सूक्ष्म घन पदार्थ आणि द्रवरूपी थेंब यामुळे हवेतील प्रदूषणाची पातळी प्रामुख्याने वाढत असते. घटणारी वृक्षसंपदा, ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे, लहान खासगी वाहनांची वाढती संख्या आणि इंधनांचा वापर यामुळे मुंबईच्या प्रदूषणाचा स्तर वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालनुसार शुद्ध हवेचे (air quility) सगळे मापदंड ओलांडल्यामुळे बर्‍याच शहरातील ८० टक्क्यांपेक्षाही अधिक लोक श्वसन विकाराने पीडित आहेत.

देशात वाढत असलेल्या प्रदूषणाच्या (pollution) पार्श्वभूमीवर २०१९ साली केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा हा कार्यक्रम हाती घेतला. हा कार्यक्रम प्रदूषणाचा स्तर अधिक असलेल्या १०० शहरांमध्ये राबवून तिथलं प्रदूषणाचं प्रमाण ५ वर्षांत २० ते ३० टक्क्यांनी करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. या कार्यक्रमांतर्गत मुंबई महापालिकेला (bmc) निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

हेही वाचा- 'या' धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीच्या खर्चात वाढ  

मुंबई महापालिकेतर्फे मुंबईत १० ठिकाणी एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. प्रभादेवी, खार, साकीनाका, कांदिवली, देवनार इ. ठिकाणांचा यात समावेश आहे. मुंबईतील प्रदूषण (pollution in mumbai) नियंत्रित करण्यासाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या नोंदींचं मूल्यांकन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण (mpc) मंडळाकडून केलं जाईल.  

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा