Advertisement

म्हाडा लॉटरी २०१७ - विजेत्यांना आठवड्याभरात मिळणार सूचना पत्र


म्हाडा लॉटरी २०१७ - विजेत्यांना आठवड्याभरात मिळणार सूचना पत्र
SHARES

म्हाडाच्या मुंबईतील ८१९ घरांसाठी १० नोव्हेंबर २०१७ला काढण्यात आलेल्या लॉटरीतील विजेत्यांसाठी गुडन्यूज आहे. विजेत्यांची प्रथम सूचना पत्राची (फर्स्ट अलॉटमेंट लेटर) प्रतिक्षा अखेर संपली आहे. दोन महिन्यांनी का होईना, पण म्हाडाच्या मुंबई मंडळाला जाग आली असून मंडळाने ८०३ विजेत्यांना प्रथम सूचना पत्र पाठवण्यास सुरूवात केली आहे. या प्रथम सूचना पत्रानुसार विजेत्यांना १ फेब्रुवारीपासून अॅक्सिस बँकेत कागदपत्र जमा करता येणार आहेत. कागदपत्र जमा करण्यासाठी ३० दिवसांची अर्थात ५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


दोन महिने सूचना पत्राचा पत्ताच नव्हता!

१० नोव्हेंबरला काढण्यात आलेल्या ८१९ घरांच्या लॉटरीत ६५ हजार अर्जदार सहभागी झाले होते. त्यातील ८०३ विजेत्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. उर्वरित १६ घरांसाठी एकही अर्ज न आल्यानं या घरांसाठी लॉटरीच फुटली नाही. दरम्यान, लॉटरीनंतर महिन्याभरात म्हाडाकडून प्रथम सूचनापत्र पाठवण्यात येतं. पण दोन महिने उलटले, तरी म्हाडाकडून या ८०३ विजेत्यांना प्रथम सूचनापत्र पाठवण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांचं हक्काच्या घरात राहायला जाण्याचं स्वप्न लांबलं होतं.


आठवड्याभरात मिळणार सूचना पत्र

आता मात्र आठवड्याभरात विजेत्यांच्या हातात सूचना पत्र पडतील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. सूचनापत्र मिळाल्यानंतर त्वरीत विजेत्यांना अॅक्सिस बँकेत कागदपत्र जमा करावी लागणार आहेत. जसजशी कागदपत्र जमा होतील, तसतशी कागदपत्रांची छाननी करत विजेत्यांची पात्रता निश्चिती करण्यात येईल. त्यानंतर ओसी मिळालेल्या घरांसाठीच्या पात्र विजेत्यांना देकार पत्र पाठवत त्यांच्याकडून घराची रक्कम भरून घेत त्यांना घराचा ताबा देण्यात येणार आहे.


६७ घरांना ओसी, काही महिन्यांत मिळणार ताबा!

सध्या अंदाजे ६७ घरांना ओसी मिळाली असल्यानं या घरांचा ताबा येत्या काही महिन्यांतच विजेत्यांना मिळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित घरांना जशी ओसी मिळेल, तसे त्या घरांचे वितरण पात्र विजेत्यांना मुंबई मंडळाकडून करण्यात येणार आहे.



हेही वाचा

गोरेगावमध्ये म्हाडाची ७००० घरं, एफएसआयमुळे २००० घरं वाढली


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा