माईंड स्पेस एएलएम सोशल मीडियातून दाखवतंय आपली कामं

Malad
माईंड स्पेस एएलएम सोशल मीडियातून दाखवतंय आपली कामं
माईंड स्पेस एएलएम सोशल मीडियातून दाखवतंय आपली कामं
माईंड स्पेस एएलएम सोशल मीडियातून दाखवतंय आपली कामं
See all
मुंबई  -  

आपल्या देशाचे माजी प्रतंप्रधान राजीव गांधी यांनी माहिती तंत्रज्ञानाला मोठी चालना दिली आहे. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईतही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सध्या जास्तीत जास्त तरुणाई सोशल मीडियाचा वापर करत आहे. विकासाची कामे असोत किंवा सामाजिक कामे, सर्वच ठिकाणी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पहायला मिळत आहे. 1998 साली मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून आणि सार्वजनिक भागीदारीतून जन्माला आलेल्या एएलएम म्हणजे अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटचा एक भाग असलेल्या माईंड स्पेस एएलएम (मालाड) हे देखील सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचे पहायला मिळत आहे.

आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हा एएलएमचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी पालिका आणि स्थानिक लोकांच्या समन्वयातून झाडे लावणे,परिसर स्वच्छ ठेवणे, ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवणे असे विविध कार्यक्रम हाती घेतले जातात. त्यासोबतच हे कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचतील, यासाठी त्यांनी एक फेसबूक पेजही तयार केले आहे.

आजवर कशाप्रकारे कामे केली गेलीत हे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/ALMMalad/

https://www.facebook.com/ALMMalad

https://www.facebook.com/pg/ALMMalad/photos/?ref=page_internal

 विशेष म्हणजे कुठची कामे केली जातात,कुठे कामे करणार आहेत यासांरखी माहिती या फेसबूक लिंक वर दिली जाते. माईंड स्पेस एएलएमचा जन्म 2013 साली झाला आणि आजपर्यंत त्यांनी 3000 हजार पेक्षा जास्त रोपं लावली आहेत. माईंड स्पेस एएलएम हायपरसिटी ते इन्फिनीटी पासून मालाडपर्यंत काम करतात.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.