मेट्रो-2-ब, मेट्रो-4 च्या कामाला लवकरच सुरूवात

 Pali Hill
मेट्रो-2-ब, मेट्रो-4 च्या कामाला लवकरच सुरूवात

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच ज्या मेट्रो 2-ब आणि मेट्रो-4 मार्गाचे भूमिपूजन केले, त्या मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला आता लवकरच सुरूवात होणार आहे. मेट्रो-2- अर्थात डीएननगर ते मानखुर्द आणि मेट्रो-4 वडाळा ते कासारवडावली या दोन्ही मेट्रो मार्गातील उन्नत मेट्रो मार्ग आणि स्थानकांसाठी एमएमआरडीएने बुधवारी निविदा काढल्या. निविदा प्रक्रिया पूर्ण करत कंत्राट बहाल करण्याच्या प्रक्रियेसाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे या कामाला पावसाळ्यानंतर सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यानुसार 23.4 लांबीच्या मेट्रो-2-ब चे पाच टप्प्यांमध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. एसिकनगर ते खिरानगर, सारस्वतनगर ते आयएलएफएस, बीकेसी एमटीएनएल ते चेंबूर आणि डायमंड गार्डन ते मंडाले या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. तर मध्य रेल्वेच्या पूर्व आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वे ओलांडणी पूल बांधण्यासाठीही निविदा मागवण्यात आली आहे. या कामासाठी 10 हजार 986 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

वडाळा ते कासारवडवली मेट्रो-4 या 32 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे कामही पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. वडाळा ते अमर महल जंक्शन, गरोडीयानगर ते सुर्यानगर, गांधीनगर ते सोनापूर, मुलुंड अग्निशमन केंद्र ते माजिवडा आणि कापूरबावडी ते कासारवडावली अशा उन्नत मार्गाच्या आणि स्थानकांच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या निविदा एकूण 14 हजार 549 कोटी रुपयांच्या आहेत.

Loading Comments