मुकेश अंबानींवर MMRDA मेहेरबान ?


SHARE

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानींवर MMRDA मेहेरबान असल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे. मुकेश अंबानीकडून 1 हजार 577 कोटींची थकबाकी वसूल कशी करायची ? यासाठी MMRDA नं विधी समितीचा अहवाल मागितला होता. मात्र एक महिना झाला तरी विधी समितीनं अहवाल दिला नाही. त्यामुळे मुंकेश अंबानिविरोधात कारवाई होत नसल्याचं उघड झालंय. MMRDA ला स्वत:चाच महसूल वसूल करण्यासाठी विधी समितीची गरज काय ? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलाय. तर महानगर आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी समितीचा अहवाल लवकरच सादर होणार असल्याचं म्हटलंय. तसंच अहवाल सादर झाल्याबरोबर तो प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवण्यात येईल. त्यानंतरच थकबाकी वसुलीसंबंधी निर्णय घेण्यात येणार असल्याचं मदान यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना स्पष्ट केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या