Advertisement

मेट्रो कामांना अटींसह परवानगी

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तिसऱ्यांदा लाॅकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली आहे. लाॅकडाऊनच्या काळात मुंबईतील सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत.

मेट्रो कामांना अटींसह परवानगी
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तिसऱ्यांदा लाॅकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली आहे. लाॅकडाऊनच्या काळात मुंबईतील सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत. पण आता मुंबईतील विकासकामे सुरू करण्यास अटींसह परवानगी देण्यात आली आहे. एमएमआरडीएतर्फे दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व या मेट्रो ७ मार्गाचे काम सुरू करण्यात आलं आहे. मागील तीन दिवसांत १२ सरकते जिने (एस्केलेटर) आणि दोन लिफ्ट आणण्यात आल्या आहेत.

लाॅकडाऊनमध्ये एमएमआरडीएच्या प्रकल्पांना अंशतः स्थगिती देण्यात आली. मात्र ही काम थांबल्याने प्रकल्पाची मुदत आणि खर्च दोन्हीवर परिणाम होत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव नसलेल्या विभागात काम सुरू करण्यासाठी परवानगी मिळवण्याबाबत प्राधिकरणाच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानुसार मेट्रो २बी (डी. एन. नगर ते मंडाळे) तसंच मेट्रो ७ (दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व ) या दोन्ही मार्गांचं काम प्राधान्याने सुरू करण्यात आलं आहे. यावेळी २३ किमी (उन्नत) अंतराच्या मेट्रो २ बी मार्गावर गर्डरच्या कामाला सुरुवात केली आहे. तर मेट्रो ७ मार्गावर पोईसर, मागाठाणे, दिंडोशी या स्थानकांवर प्रत्येकी चार सरकते जिने, तर आकुर्ली स्थानकात दोन लिफ्ट बसवण्यात येतील.

मेट्रो प्रकल्पाशी संबंधित कामे वेगाने होत असून, वेळेवर काम पूर्ण करण्याकडे भर दिला जात आहे, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. मेट्रो स्थानकात स्वयंचलित दरवाजे, तिकीट वेंडिंग मशिन, ऑटोमॅटिक वेंडिंग मशिन आदींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.हेही वाचा -

मुंबईत रात्री 'या' वेळेत घराबाहेर पडण्यावर निर्बंध

रेशनचं धान्य घेताना आता ‘अंगठा’ लावण्याची गरज नाही!
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा