Advertisement

राज्यातले अजून काही ब्रिज पडू शकतात - चंद्रकांत पाटील


राज्यातले अजून काही ब्रिज पडू शकतात - चंद्रकांत पाटील
SHARES

22 वर्षांपूर्वी बांधलेल्या अमर महाल पुलाचे आता कसे संशोधन करणार? त्याने काय मटेरियल वापरले आहे, कमी वापरले किंवा चुकीचे वापरले असते तर पूल तेव्हाच पडला असता, असे वक्तव्य राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले. तसेच सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्यातीलही काही पूल पडू शकतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.


चंद्रकांत पाटील म्हणतात...

  • मालाचा दर्जा खराब असता तर अमर महल ब्रिज 22 वर्षांपूर्वीच पडला असता
  • राज्यातले अजूनही काही ब्रिज पडू शकतात
  • 4 महिन्यात नवीन पूल बांधून देऊ
  • पुलाची वॉरंटी संपली होती, कारवाईचा प्रश्नच येत नाही
  • दुर्घटना घडल्यावरच प्रश्न उपस्थित केले जातात

अमर महल पुलाचा सांधा 6 एप्रिलला निखळला होता, अशी माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर दुसरा सांधाही एका ठिकाणी निखळला होता. मनुष्यहानीची भविष्यात हानी नको म्हणून पूल बंद करण्यात आला आहे. या पुलाला टेकू लावून सुरू करण्याचा प्रस्ताव होता, मात्र हा प्रस्ताव अमान्य केला गेला आणि नव्याने पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती देत 4 महिन्यांत नवीन पूल बनवण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी कामामध्ये रस दाखवला तर दोन महिन्यात काम पूर्ण होऊन जाईल. पूल बनविण्यासाठी पुलासाठी लागणारे ब्लॉक्स, रस्ते वेगळ्या ठिकाणी बनवून अमर महलच्या ठिकाणी बसविले जाणार आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, अमर महल पुलाचे काम करणाऱ्या कंपनीच्या संचालक आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असे विचारले असता कंपनीने पाच वर्षांची वॉरंटी दिली होती. ती कधीच पूर्ण झाली आहे. कंपनीवर अॅक्शन घेण्याचा प्रश्न येत नाही. घटना घडल्यावर सर्वजण प्रश्न उपस्थित करतात. लोकांची गैरसोय लवकरात लवकर दूर करण्यासंदर्भात नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा प्रयत्न असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा