मेट्रो 3मुळे 327 कुटुंबांचे स्थलांतर

  Pali Hill
  मेट्रो 3मुळे 327 कुटुंबांचे स्थलांतर
  मुंबई  -  

  मुंबई - कुलाबा- वांद्रे - सीप्झ या मार्गिकेवर प्रस्तावित असलेल्या मेट्रो- ३ प्रकल्पामुळे माहिमच्या नया नगरमधील ३२७ कुटुंब बाधित होणार आहेत. या कुटुंबांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने लॉटरी पद्धतीने सदनिका जाहीर करण्यात आल्या. या कुटुंबियांना बुधवारी सदनिका वाटपपत्र देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात स्थलांतराला सुरुवात करण्यात येणार असल्याचे एमएमआरसीतर्फे सांगण्यात आले.

  मेट्रो-३ मार्गामुळे एकूण २ हजार ८०७ युनिट्स बाधित होणार आहे. त्यामुळे एमएमआरसीतर्फे २ हजार ८०७ युनिटचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यापैकी १ हजार ८६६ घरगुती, ३९ घरगुती वजा व्यावसायिक आणि ७९५ व्यावसायिक युनिट आहेत. एकूण ३२७ पैकी ३०९ जणांना कुर्ला परिसरात स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

  मेट्रो-३चे बांधकाम सुरू होण्यापूर्वी सर्व बाधितांचे पुनर्वसन करणे ही आमची सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे, असे एमएमआरसीतर्फे सांगण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीय लॉटरी पद्धतीचा वापर केला असल्याचं एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.