Advertisement

वर्सोवा-विरार सागरी सेतूला एमएसआरडीसीची मान्यता

वरळी (Worli) येथून सुरू होणारा सागरी सेतू (sea link) आता थेट विरारला जोडला जाणार आहे.

वर्सोवा-विरार सागरी सेतूला एमएसआरडीसीची मान्यता
SHARES

वरळी (Worli) येथून सुरू होणारा सागरी सेतू (sea link) आता थेट विरारला जोडला जाणार आहे. वर्सोवा ते विरार सागरी सेतूला (Versova - Virar Sea link) राज्य रस्ते विकास महामंडळाने (State Roads Development Corporation -एमएसआरडीसी) मान्यता देण्यात आली आहे. या सागरी सेतूमुळे वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. 

 वर्सोवा ते विरार (Versova to Virar) हा सागरी सेतू ५७ किलोमीटर लांबीचा आहे. या सागरी सेतूसाठी ३२ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. गुरूवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली एमएसआरडीसीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी सागरी सेतूच्या विस्तारीत प्रकल्पास मान्यता देण्यात आली. या बैठकीस राज्यमंत्री संजय बनसोडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के उपस्थित होते.

वरळी-वांद्रे सागरी सेतूचं (Worli-Bandra Sea link) काम पूर्ण झाल्यानंतर या सागरी सेतूचा वर्सोवापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता. त्यानुसार या मार्गाचं कामही सुरू झालं आहे.  तिसऱ्या आणि चौथ्या टप्यात वर्सोवा ते वसई दरम्यान २२ हजार कोटी रूपये खर्चून सहा पदरी सागरी सेतू बांधण्यात येणार असून पुढच्या टप्यात हा मार्ग विरारपर्यंत वाढविण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी तो मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीकडे पाठविण्यात आला आहे. 


हेही वाचा -

मुंबईत येत्या २ वर्षांत २० नवे मॉल्स

लोकप्रतिनिधींच्या दारी बेस्ट कर्मचारी; मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं अनोख आंदोलन
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा