Advertisement

कोस्टल रोड: प्रियदर्शनी पार्क ते प्रिन्सेस स्ट्रिट बोगद्याच्या कामाची सुरूवात होणार


कोस्टल रोड: प्रियदर्शनी पार्क ते प्रिन्सेस स्ट्रिट बोगद्याच्या कामाची सुरूवात होणार
SHARES

मुंबईत मेट्रो प्रकल्पानंतर नव्या 'कोस्टल रोड'च्या प्रकल्पाचं काम जोरात सुरू आहे. 'कोस्टल रोड' साकारण्यासाठी सोमवारपासून दक्षिण मुंबईतील प्रियदर्शनी पार्क येथून सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मावळा संयंत्र कार्यान्वित करुन कोस्टल रोडसाठी बोगदा खोदकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी सुटावी आणि वाहनांची वाहतूक सुरळीत पार पडावी यासाठी पश्चिम उपनगरातील समुद्र किनारी देशातील पहिला 'कोस्टल रोड' उभारण्याचं काम जोमात सुरू आहे.

या कोस्टल रोडचे काम २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सिलिंक, असा १०.५८ किलोमीटरचा हा कोस्टल रोड बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १२,७२१ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत १३०० कोटी रुपये खर्चून १७ – २० टक्के विकास कामे पूर्ण झालेली आहेत. कोस्टल रोडवर २.०८२ किलोमीटरचे २ बोगदे असणार आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चायना मेड टीबीएम वापरले जाणार आहे.

या मशीनला 'मावळा' असं मराठमोळे नाव देण्यात आलं आहे. या मशीनचा व्यास १२.१९ मीटर आहे. बोगद्याच्या अंतर्गत व्यास ११ मीटर असणार आहे. बोगद्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व व्यवस्था असणार आहे. जमिनीखालून २ बोगदे खोदण्याचं काम ७ जानेवारीपासून सुरू करून पुढील १८ महिन्यात या बोगद्यांचं काम पूर्ण करण्यात येणार होते. मात्र आता भुयार खोदण्याचे काम ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

सोमवारी दुपारी १:०० वाजता प्रियदर्शनी पार्क येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘कोस्टल रोड’ अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत बोगदा खोदकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या बोगदा खोदकामासाठी आणलेले भव्य असे 'मावळा' यंत्र याप्रसंगी कार्यान्वित करण्यात येणार आहे. याप्रसंगी, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार तथा पालकमंत्री (मुंबई उपनगरे जिल्हा) आदित्य ठाकरे, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित असणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा